80 वर्षीय महिलेचे उपोषणास्त्र, प्रशासन करते आता विनवणी, कलावती यांचा एका तपापासून या मागणीसाठी पाठपुरावा
शेतरस्त्याच्या मागणीसाठी ती माऊली उपोषणाला बसली.
तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील ही महिला.
गट ७४ येथील शेतीला रस्ता मिळावा, अशी या माऊलीची मागणी आहे.
 
प्रशासन किती मुर्दाड असते. याचा प्रत्यय आज धाराशिव येथे आला. गेल्या १२ वर्षांपासून या महिलेची साधी मागणी पूर्ण केली नाही. शेतरस्त्याच्या मागणीसाठी ती माऊली उपोषणाला बसली. तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील ही महिला. गट ७४ येथील शेतीला रस्ता मिळावा, अशी या माऊलीची मागणी आहे. महिलेचा आसा आरोप आहे की, शिवबांधावर एमएसईबी आणि संबंधितांनी संगनमत करून राजकीय दबाव निर्माण केला. बेकायदेशीररीत्या रोवलेले लाईटचे पोल काढण्यात आले. गट क्रमांक ७४ ला रस्ता देऊन संबंधित दोषींवर हद्दफोडीचा गुन्हा नोंदवण्यात यावी, अशी यांनी मागणी आहेत. या महिला ८० वर्षीय कलावती काशिनाथ जाधव आहेत.
 
प्रशासनाची उडाली भंबेरी - धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तहसील कार्यालयाकडे अर्ज करूनी शेत रस्ता दिला जात नाही. असा आरोप करीत खुंटेवाडी येथील कलावती जाधव ही 80 वर्षीय वृद्ध महिला जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला बसल्या आहेत. गेल्या बारा वर्षापासून सलग शेत रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ही महिला आमरण उपोषणाला बसली आहे. महिलेने उपोषण सुरू करतात प्रशासनाची ही चांगलीच भंबेरी उडाली होती. उशिरापर्यंत महिलेने उपोषण मागे घ्यावा यासाठी प्रशासनाकडून विनवनी सुरू होती. आतापर्यंत लाईटली घेणारे प्रशासकीय कर्मचारी आता घाबरलेले दिसले. या महिलेचं उपोषणादरम्यान काही बरेवाईट झाल्यास काय होणार, अशी चिंता त्यांना सतावू लागली. त्यामुळे उपोषण मागे घेण्यासाठी प्रशासकीय कर्मचारी महिलेला विनवनी करत आहेत.