कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा CM शिंदेकडून सानुग्रह अनुदान जाहीर
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३५० रुपये अनुदान
मुंबई Apmc सोडून राज्याचे सर्व बाजार समितीमध्ये योजना लागू
नवी मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी राज्य सरकारकडून   कांदा अनुदान संबंधित महत्त्वाची अपडेट आली आहे, त्यानुसार आता शेतकऱ्यांना 350 रुपये दराने प्रतिक्विंटल कांद्याला अनुदान मिळणार आहे.
आजच राज्य शासनाद्वारे कांदा अनुदान 2023 शासन निर्णय जाहीर झालेला आहे, यानुसार आता शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल कांद्याला 350 रुपये अनुदान भेटणार आहे. हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये अर्ज करावा लागणार आहे.
ज्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्याने कांदा विकला होता तेथे जाऊन कांदा अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. त्यासंबंधीची माहिती आपण या Video मधे देणार   आहोत,
बिधानसभेच्या   अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 300 रुपये प्रतिक्विंटल दराने अनुदान जाहीर केले होते. परंतु या निर्णयामुळे शेतकरी असंतुष्ट होते आणि विरोधकाने सरकारला धारेवर धरल होता .कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चंगळ बाजारभाव कशी मिळणार आणी यासाठी काय काय उपायोजना करण्यात येईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी पणन संचालक डॉक्टर सुनील पवार याना नेमणूक केली होती ,पवार यांनी राज्यातील बाजार समितिमधे प्रत्यक्ष भेटी देयुन शेतकरी,व्यापारी,अडते,विविध संगठनाचे प्रतिनिधी,निर्यातदार,तज्ञयाना भेटी घेयून पाहणी दौरा केला आणि समस्याचा आढावा घेत अहवाल सादर केला होता .राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अनुदानामध्ये 50 रुपयांची वाढ करत शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपये प्रमाणे अनुदान जाहीर करण्याचा निर्णय घेतला गेला. (kanda anudan 2023 GR)
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आज सरकार द्वारे शासन निर्णय देखील पारित करण्यात आलेला आहे, या शासन निर्णयामध्ये कांदा अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? कसे मिळणार? त्यासाठी प्रक्रिया काय आहे? किती रुपये अनुदान मिळणार? त्यासंबंधी संपूर्ण माहिती GR मध्ये देण्यात आली आहे.
01 फेब्रुवारी, 2023 ते 31 मार्च, 2023 या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकला होता अशा शेतकऱ्यांनाच कांदा अनुदान मिळणार आहे, याबरोबरच अनुदान हे लाल कांद्यासाठीच लागू असणार आहे.
-प्रथम तुम्हाला ज्या बाजार समितीमध्ये तुम्ही कांदा विकला होता त्या बाजार समितीमध्ये जायचे आहे.
बाजार समितीमध्ये तुम्हाला खाली सांगितल्याप्रमाणे कागदपत्रे सादर करायचे आहेत.
कागदपत्रे सादर केल्यानंतर बाजार समितीद्वारे देण्यात आलेला फॉर्म भरायचा आहे.
त्यानंतर सोबत आणलेली कागदपत्रे आणि तो फॉर्म एकत्रित बाजार समितीमध्ये जमा करायचा आहे.
अशा प्रकारे तुम्ही कांदा अनुदान 2023 साठी पात्र व्हाल, फक्त सांगितलेल्या सूचना पालन करा फॉर्म भरताना माहिती अचूक भरा तरच तुम्हाला कांदा अनुदान भेटेल. चुकीची माहिती जर तुम्ही सादर केली तर तुमचा अर्ज बाद होईल, यामुळे तुम्हाला कांदा अनुदान भेटू शकणार नाही. म्हणून {kanda anudan 2023 GR} पोस्ट मधली सगळी माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या.
* कांदा विक्री पावती
* सातबारा उतारा
* बँक खाते पासबुक
कांदा अनुदान 2023 मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वरील कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे, ही कागदपत्रे सादर करीत असताना बाजार समिती द्वारे देण्यात येणारा फॉर्म भरून घ्यायचा आहे. आणि तो या कागदपत्रासोबत बाजार समितीमध्ये सादर करायचा आहे, तेव्हाच शेतकऱ्यांना कांद्या साठी प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान भेटणार आहे.
तर मित्रांनो ही होती कांदा अनुदान 2023 संबंधीची महत्त्वाची Latest अपडेट, माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट साठी ApmcNews.com या आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.