आरबीआयची घोषणा; कृषी क्षेत्राला दिलासा देणारी बातमी
बँक ग्राहकांसह कृषी क्षेत्राला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आज झालेल्या बैठकीत EMI (समतुल्य मासिक हप्ता) जैसेथे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच व्याज दरातही कोणताही बदल न करण्याच्या निर्णयाची घोषणा आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली. तसेच कोरोना संकटातून देशाची अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचंही शक्तिकांत दास यांनी आज स्पष्ट केले. तसेच दास यांच्या मते कृषी क्षेत्राच्या मदतीमुळे ग्रामीण भागातील कर्ज मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
आरबीआयकडून बँकांना कर्ज दिले जाते. त्याला रेपो रेट म्हटले जाते. बँक या कर्जातून ग्राहकांना कर्ज देतात. त्यामुळे रेपो रेट कमी झाल्यावर बँकेतून मिळणारे अनेक प्रकारचे कर्जही स्वस्त होतात. उदा. गृह कर्ज, वाहन कर्ज, सोने तारण कर्ज तसेच कृषी व्यवसाय संबंधी कर्ज