मुंबई APMC फळ मार्केटमध्ये केळीच्या दरात ३० ते ४० टक्यांनी वाढ!
फळ मार्केट मध्ये   आवक घटली, ५ ते ६ गाड्या दाखल
नवी मुंबई : आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारी साधी केळी त्याचबरोबर विशेषतः वेलची केळीची[Banana price ] मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात अवकाळी पावसामुळे उत्पादनाला फटका बसत असून उत्पादनात घट होत आहे, तसेच मागणी वाढल्याने निर्यात ही वाढली आहे.   त्यामुळे साधी केळी प्रतिडझन १० ते २० रुपयांनी तर वेलची केळी ३० ते ४० टक्यांनी वधारली आहेत.
मुंबई APMC फळ मार्केट मध्ये सोलापूर, कर्नाटक ,तमिळनाडू आणि अत्यल्प प्रमाणात वसईची केळी दाखल होत आहेत. परंतु सध्या बाजारात अवकाळी पावसाने उत्पादन घटत असून मोठ्या प्रमाणावर दर्जेदार केळींची निर्यात वाढत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढत असल्याची माहिती घाऊक व्यापाऱ्यांनी दिली आहे. APMC फळमार्केट मध्ये दररोज १५ ते २० ट्रक ची आवक होती परंतु आता बाजारात आवक घटली असून अवघ्या ५ ते ६ गाड्या दाखल होत आहेत. घाऊक बाजारात आधी ५० ते ६० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध असलेली केळी आता ७०ते ७५ रुपयांनी विक्री होत आहे. तसेच साधी केळी आधी ३० ते ४०रुपये डझन उपलब्ध होती ती आता ५० ते ६० रुपयांनी उपलब्ध आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा केळीचे दर खूपच वाढले आहेत. कामगार खर्च, इंधन दरवाढ त्यामुळे होणारी वाढ. शिवाय अवकाळी पावसाने उत्पादनाचे होत   असलेले नुकसान, परिणामी उत्पादन घटले आहे. तसेच दर्जेदार केळींची निर्यात ही दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे ३०% ते ४०% दरवाढ झाली आहे.