APMC NEWS IMPACT: बेदाण्याच्या लिलाव गृहात खजुराची विक्री पणन संचालकांनी घेतली दखल
- बेदनाच्या लिलाव गृहात खजूर असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक
- पणन संचालकांनी घेतली 'APMC NEWS डिजिटल' बातमीची दखल
- पणन संचालक विनायक कोकरे यांनी APMC प्रशासनाला परिपत्रक काढून मागितले अहवाल
- माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते ९ मार्च रोजी झाले   उद्घाटन
- मार्केटमध्ये   लिलावगृहात   बेदाण्याला हमीभाव नसल्याने शेतकरी निराश
- मोठ्या थाटात सुरु करण्यात आलेले बेदाणा लिलाव केंद्र बनले फसवणुकीचे केंद्र
नवी मुंबई : मुंबई Apmc मसाला मार्केटमध्ये बेदाणाच्या लिलाव केंद्रात खजूर विक्री होत असल्याची बातमी Apmc News डिजिटल यांनी २० मार्च रोजी हि दाखवली होती ,सदर लिलावगृह स्वतत्र असून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद   पवार यांच्या हस्ते ९ मार्च रोजी   उदघाटन करण्यात आले होते . मुंबई APMC मसाला मार्केट   संचालक यांच्या गोदामात हा लिलाव केंद्र सुरु करण्यात आला   . मार्केट मध्ये येणाऱ्या बेदाणाच्या   शेतकऱ्यांची या लिलावगृहात कशा प्रकारे   फसवणूक सुरु होती..   शेतकऱ्याने आपली बाजू मांडली असताना त्याआधारे   Apmc News डिजिटल यांनी संपूर्ण बातमी दाखवली होती . APMC NEWS डिजिटल चॅनेलच्या बातमीची   दखल राज्याच्या पणन संचालकांनी   घेतली असून मुंबई कृषी उत्पन बाजार समितीला सदर लिलावगृहाबाबत चौकशी करुन अहवाल सादर करावा असे   आदेश पणन संचालक विनायक कोकरे यांनी दिली आहे ,त्यामुळे   मुंबई Apmc प्रशासनाने गाळ्याचे मालक आणि मार्केट संचालक विजय भुत्ता   यांना पण नोटीस दिल्याचे समजते   .   त्यामुळे बेकायदेशीर सुरु झालेल्या बेदाणाच्या लिलाव केंद्रवर शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे ..या केंद्रात बेदाणा एवजी खजूर विक्रीच्या व्यवसाय जोरात सुरु होता आणि हे शेतकरी आपल्या शेतमाल घेऊन येत होते.तसेच   आपल्या स्थानिक बाजार समिती मध्ये मिळणाऱ्या भाव पेक्षा   कमी भाव मिळत असल्याने   शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची कमी दराने विक्री करुन निघायची वेळ आली होती .. मोठ्या थाटाने सुरु करण्यात आलेल्या या लिलाव केंद्रात शेतकऱ्यांसाठी या व्यपाऱ्यासाठी अनेक प्रश्न उपस्थित होत आहे ,महत्वाची   बाब अशी आहे कि बाजार समितीकडे लिलाव केंद्र असताना एका व्यपाऱ्याच्या गाळ्यावर स्वतंत्र लिलाव केंद्र का ? व्यापारी कधी शेतकऱ्यांना भाव देणार का ? हा लिलाव केंद्र सुरु करण्यासाठी पणन संचालक आणि बाजार समितीची परवानगी घेण्यात आली होती का ? असे सवाल   उपस्थित होत आहे .
मुंबई APMC   मसाला मार्केट मध्ये ९ मार्च रोजी माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बेदाणा लिलाव केंद्राचे उदघाटन मोठया थाटात करण्यात आले होते ... हा स्वतंत्र लिलाव केंद्र मसाला मार्केट संचालक विजय भुता यांच्या गाळ्यात सुरु करण्यात आले... मात्र आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की या बेदाण्याच्या लिलाव गृहात बेदाण्याऐवजी   खजुराची विक्री मोठ्या संख्येने झाली .त्यामुळे हा लिलाव केंद्र बेदाणासाठी आहे कि खजुरासाठी अशी चर्चा   शेतकऱ्यांमध्ये होत होती..
पंढरपूर ते मुंबई Apmc मसाला मार्केटच्या ५०० किलो मिटर प्रवास करून येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला अवघे ५ ते १० रुपये मिळत असल्याने शेतकरी निराश होऊन आपला शेतमाल परत घेऊन न जाता आपले नुकसान करून कवडीमोल भावात विकून टाकतात .. या स्वतंत्र बेदाणा लिलावगृहात तुम्ही आत प्रवेश केला तर तुम्हाला बेदाण्याऐवजी खजूर बघायला मिळणार ... याचाच अर्थ मार्केट   संचालकांनी आपल्या फायदासाठी   शेतकऱ्यांच्या नावाखाली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची   दिशाभूल करून आपल्या गाळ्यावर स्वतंत्र लिलाव केंद्र सुरु करून माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अधक्ष्य शरद पवार यांच्या सोबतच शेतकऱ्यांची फसवणूक सुरु केली आहे .. त्यामुळे या लिलावगृहात शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे असे दिसून येत आहे.. सर्वात महत्वाची बाब अशी आहे कि हे लिलाव गृह चालवण्यासाठी मुंबई कृषी उत्पन बाजार समिती या पणन संचालकांची   कुठली ही परवानगी नाही त्यामुळे बाजार आवारात शेतकऱ्यांना फसवणूक झाली   तर यांची जबाबदार कोण ? असे प्रश्न उपस्थित होत आहे .
मुंबई Apmc मसाला मार्केट मध्ये ड्रायफ्रुटसची जवळपास ३०० दुकाने   आहेत त्यामुळे येथे बेदनाच्या लिलाव केंद्र सुरु करून याचा फायदा शेतकऱ्यांना   होणार असे संचालक विजय भुत्ता यांनी माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष्य शरद पवारांना विश्वासात घेऊन बेदाणा लिलाव केंद्राचे शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन झाले.. शरद पवार साहेब आमच्यासाठी दैवत आहेत..   बेदाणा लिलाव केंद्राची उदघाटन केलेल्याची बातमी पाहून आम्ही शेतकरी मुंबई Apmc मसाला मार्केट मध्ये आपला शेतमाल बेदाणा विक्री साठी घेऊन आलो. या ठिकाणी लिलावासाठी सव्वा दोन टन बेदाने आणले परंतु पंढरपूर मध्ये मिळणाऱ्या हमीभावापेक्षा फक्त १० रुपये जास्त भाव मिळाल्याने संभाजी शिंदे या शेतकऱ्याची   निराशा झाली आहे .. बेदाण्याला भाव मिळाला नाही , आहे त्या दरातच विक्री करणार असल्याचे   APMC न्यूज ला शेतकरी संभाजी शिंदे यांनी सांगितले ... सोबतच बेदाणा लिलाव केंद्र फक्त बेदाणा लीलाव व्हायला हवा परंतु या बेदाणा लिलावगृहात खजूर व आणखी सुकामेवा विक्री होत असल्याने शेतकऱ्यांसाठी मोठे स्टोरेज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकरी गणपत महादेव शिंदे   यांनी केली ..त्यामुळे संचालकांनी   शेतकऱ्यांसाठी नव्हे तर आपल्या फायद्यासाठी हा स्वतंत्र लिलाव केंद्र बेकायदेशीर असून यावर त्वरीत कारवाई करावी आणि बाजार समिती कडे असणाऱ्या eNAM केंद्रावर सुरु करावी अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी केली आहे.