बदलत्या वातावरणाने पपई फळ धोक्यात; शेतकऱ्यांनी बागा केल्या उध्वस्त
रब्बी हंगामातील पपई अंतिम टप्प्यात असतानाच येथे वाढत्या तापमानामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे शिवाय पानगळही होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात अशी विचित्र परस्थिती निर्माण झाल्याने शेती व्यवसाय करावा तरी कसा? असा सवाल उपस्थित केला जात आहे. बदलत्या वातावरणामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वर्षभर केवळ पदरी नुकसानच पडत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी हे पपई बागा उध्वस्त करीत असल्याचे चित्र आहे. उत्पन्न तर सोडाच पण वर्षभर केलेला खर्चही शेतकऱ्यांना मिळत नाही. निसर्गाच्या अवकृपेमुळे प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला जात आहे.
वाढत्या तापमानाचा परिणाम काय?
जिल्ह्यात वाढते तापमान आणि विषाणूजन्य आजारांमुळे होणारी पानगळ मुळे दुहेरी संकटात नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी सापडला. विषाणू जन्य आजारांमुळे पानगळ तर वाढत्या तापमानात पपई ची फळे पिवळे पडत आसल्याने शेतकऱ्याचा बागा उध्वस्त होत आहेत. जिल्ह्यात आचानक तापमानात वाढ झाली तापमान 40 अंश सेल्सिअस चा वर तापमानाचा पारा गेला आहे. पानगळ झाल्याने सूर्य प्रकाश थेट फळावर पडत आसल्याने त्याचा परिणाम पपई च्या फळावर झाला असून ते झाडावर खराब होऊन पिवळी पडत आसल्याने ते काढून फेकल्या शिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांकडे नाही.
संरक्षण हाच एकमेव पर्याय
वाढत्या ऊन्हामुळे पपईची पानगळ झाली आहे. त्यामुळे सूर्य प्रकाश थेट पपईंवर येत असल्याने पपई ही पिवळी पडली आहे. शिवाय अनेक ठिकाणी पपई पिकाचा खराबा झाला आहे. ज्या शेतकऱ्यांचा माल खराब झाला नाही त्यांनी पपईला आवरण घालणे महत्वाचे आहे. सध्या उन्हामध्ये तीव्र वाढ झाली असून अजून काही दिवस असेच वातावरण राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पपई बचावासाठी गोणपाटाचा वापर करुन फळ सुरक्षित ठेवणे हाच पर्याय असल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे पद्माकर कुंडे यांनी सांगितले आहे.
रस शोषणाऱ्या कीडीचाही प्रादुर्भाव
यंदा वातावरणातील बदलाचा परिणाम सर्वच पिकांवर झाला आहे. यामधून पपई बागांचीही सुटका झाली नाही. अगोदर पावसामुळे रस शोषणाऱ्या कीडीचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे पाने गुंडाळली गेली तर पपई बागांची अपेक्षित वाढच झाली नाही. तर आता अंतिम टप्यात होत असलेल्या नुकसानीमुळे उत्पादनात घट होणार आहे. मध्यंतरी व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये दरावरुन मतभेद होते. ते मिटले असून आता थेट उत्पादनाचाच प्रश्न निर्माण झाला आहे.