सूर्यफुल तेलाच्या दरात १५ टक्क्यांची घट
खाद्यतेलाच्या बाजारात सध्या नरमाईचे सावट
मागच्या काही काळापासून खाद्य तेलाच्या किंमती वाढल्याने गृहिणींच्या फोडणीवर मर्यादा आल्या होत्या
खाद्यतेल बाजारात सध्या नरमाईचे सावट आहे. त्यातच बॅंकिंग क्षेत्रावर संकटाची चाहूल आहे. त्यामुळे सूर्यफुल तेलाचे भाव मागील अडीच वर्षातील निचांकी पातळीवर पोचले आहेत.तसेच रशिया आणि युक्रेनमध्ये सूर्यफुल तेलाच्या दरात दोन महिन्यातच १५ टक्क्यांची नरमाई आली.
सोयाबीन तेलाचे वायदेही सध्या दबावात आहते. तर युरोपियन युनियनमध्ये मोरही तेलाचे दर कमी झाले. त्याचा दबाव रशिया आणि युक्रेनच्या सूर्यफुल तेलावर येत आहे. चीनमध्ये सध्या खाद्यतेलाचा मोठा साठा आहे. तर युरोपियन खरेदीदारांकडेही पुरेसा पुरवठा सुरु आहे.
तर भारताने सूर्यफुल तेलावरील आयातशुल्क काढलेले आहे. याचा दबाव सूर्यफुल तेलाच्या दरावर येत आहे. पण हा दबाव कमी कालावधीसाठी असेल, असे सूर्यफुल तेल निर्यातदारांनी सांगितलं.
खाद्यतेलाचे दर आणखी उतरले आहेत. यामुळे सामान्यांच्या खिशाला लागणारी चाट काही प्रमाणात कमी झाली आहे. खाद्यतेलाच्या किमतीत वारंवार वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले होते.