लिंबाच्या दरांमध्ये वाढ 60 ते 80 रुपये किलो दराने विक्री
उन्हाळ्यात लिंबाच्या मागणीत मोठी वाढ
लिंबूचा भाव वाढला! तापमानासोबत लिंबूच्या किंमतीत ही वाढ
सध्या तापमानात सातत्याने चढ उतार होत आहेत. कधी उन्हाचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण तर काही भागात अवकाळी पावसाचाधुमाकूळ सुरु आहे. काही भागात दुपारी उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे लिंबाच्यामागणीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून लिंबाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. 60 ते 80 रुपये किलो प्रमाणे लिंबाची विक्री केली जात आहे. याचा लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
लिंबाची आवक कमी, दरात तेजी
उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच लिंबाच्या दरात वाढ सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या लिंबाच्या दरात चांगली वाढ झाली आहे. 60 ते 80 रुपये किलो प्रमाणे लिंबाची विक्री केली जात आहे. तर किरकोळ बाजारात ग्राहकांना त्यासाठी 100 ते 120 रुपये मोजावे लागत आहेत. त्यातच खराब हवामान आणि अवकाळी पावसाचा परिणाम लिंबाच्या उत्पादनावर होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी असल्यानेही भाव तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहेत.
अवकाळी पावसाचा लिंबाला फटका
महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात लिंबाचं उत्पादन घेतलं जाते. मात्र, काही वेळाला हवामानातील बदलाचा मोठा फटका लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना बसतो. सध्या राज्यात काही भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. याचा फटकाही लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून मध्य प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानच्या मार्केटमध्ये लिंबू पाठवली जातात. आंध्र प्रदेश सर्वात जास्त लिंबाचे उत्पादन करणारे राज्य आहे. त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि ओडिशा या राज्यांचा क्रमांक लागतो.