उन्हाळ्यापूर्वीच लिंबू ३०० रुपये शेकडा
उन्हाळ्यापूर्वीच लिंबू ३०० रुपये शेकडा
लिंबू का महागले ? 
भाव आणखी वाढण्याची शक्यता
नवी मुंबई: अजून उन्हाळ्याला सुरुवात झाली नसली तरी लिंबूचे भाव अचानक वाढले आहेत. फेब्रुवारी च्या दुसऱ्या आठवड्यात लिंबाचे दर शेकडा ३०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ व्यापारी मोठ्या आकाराचे लिंबू १० रुपयांना दोन व लहान आकाराचे १० रुपयांना तीन विकत आहेत, उन्हाच्या झळा सुरू होताच भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबू २०० रुपये शेकडा दराने विकले जात आहेत. तर किरकोळ विक्रेते व ३०० ते ४०० रुपये शेकडा दराने विकत आहेत.
गेल्यावर्षी मान्सून चांगला बरसला, पण सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने लिंबाच्या बागांचे नुकसान झाले. आता ऊन तापण्यास सुरुवात झाली असल्याने मागणी वाढू लागली आहे. मागणी जास्त व पुरवठा कमी झाल्याने लिंबाचे दर वाढत आहेत