BREAKING | दहवीच्या परीक्षेचा पहिलाच पेपर, दोन विद्यार्थ्यांचा भीषण अपघात, दुर्दैवी मृत्यू
 
नाशिक | राज्यभरात आज दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु झाली आहे. आज पहिल्याच दिवशीच्या पेपरला नाशिकमध्ये एक भीषण घटना घडली. परीक्षेला जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा भयंकर अपघात झाला. एका गॅसच्या ट्रकने या दोन विद्यार्थ्यांना धडक दिली. हे दोन्ही विद्यार्थी दुचाकीवरून परीक्षेसाठी जात होते. मात्र ट्रकने धडक दिल्याने त्यांच्या दुचाकीचा चक्काचूर झाला. तर विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.