मुंबई Apmc मसाला मार्केटमध्ये खजुराच्या भावात झाली वाढ इराकमधील ‘जाएदी’ला मागणी
रमजानमुळे खजुराच्या भावात झाली वाढ
काजू बदाम पेक्षा खजुरच्या दरांत वाढ
घाऊक बाजारात २४० ते १२०० रुपये किलो दराने विक्री
नवी मुंबई : रमजानचा रोजा सोडताना खजूर खाण्याची प्रथा असल्याने, रमजान महिन्यात खजुराच्या विक्रीत वाढ होते. यंदा रमजान सुरू होण्याच्या आठवडाभर पूर्वीपासूनच खजुराची मागणी वाढली असून, किमतीत १० ते १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली.
मुंबई APMC मसाला मार्केटमध्ये किमिया या खजुराला मोठी मागणी असून,घाऊक बाजारात २४० ते १२०० रुपये किलो दराने विक्री केले जात आहेत.५०० रुपयांनी विकणारे खजूर आता १०० रुपयांची वाढ होऊन ६०० रुपये दर आहे त्याचप्रमाणे इतर खजुरांच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे. मध्य पूर्वेच्या देशांमधून येणाऱ्या खजुराला जास्त मागणी आहे. ट्युनिशिया येथील खजूर २०० रुपये, तर इराणमधील ब्लॅक लिली खजूर २४० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. सौदी अरेबिया येथील नावर जुमेरा खजुरासाठी किलोमागे २४० रुपये मोजावे लागत आहेत
दर किमान २४० ते १२०० रुपये किलो
किमान २४० रुपयांपासून १२०० रुपये किलो दरापर्यंतचे खजूर सध्या मुंबई APMC मसाला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. सूर्यास्तानंतर रोजा सोडण्याच्या वेळी ज्या व्यक्ती घराबाहेर इफ्तारी करतात. रमजानचा रोजा सोडताना खजूर खाण्याची प्रथा असल्याने, रमजान महिन्यात खजुराच्या विक्रीत वाढ होते. यंदा रमजान सुरू होण्याच्या आठवडाभर पूर्वीपासूनच खजुराची मागणी वाढली असून, किमतीत १० ते १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली.