विडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा खाणाऱ्यां तरुणांनो सावधान; कर्करोग सर्वाधिक बळी घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा आजार
कर्क दिनानिमित्त घेलेल्या आढाव्यात देशातील कर्करोग वाढीचा वेग गत दशकभरात सुमारे तिप्पट झाला असल्याने या दशकाच्या अखेरपर्यंत कर्करोगाच्या प्रमाणात १० ते १२ टक्क्यांनी वाढ होण्याची भीती तज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यातही तरुणाईला कर्करोग होण्याचे प्रमाणदेखील गत दशकभरापासून सुमारे १५ असून ते २० टक्क्यांनी वाढले असून त्याला बदललेली जीवनशैलीच असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते कॅन्सर हा सर्वाधिक बळी घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा आजार झाला आहे. अनेक प्रकरणांमध्ये तंबाखू, गुटखा हे कॅन्सरचे मुख्य कारण आढळून आले आहे. तंबाखू सेवन करणाऱ्या लोकांमध्ये सेवन सुरु केल्यानंतर एक-दीड दशकानंतर कॅन्सर आढळतो. तंबाखू सेवनामुळे लोकांना ओरल म्हणजे तोंडाचा, पॅनक्रिएटिक म्हणजेच स्वादुपिंडाचा, सर्विक्स अर्थात गर्भायशाचं मुख, ओव्हरीज म्हणजेच अंडाशय, लंग फुप्फुर्स आणि ब्रेस्ट म्हणजेच स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढली आहे.
बदलती जीवनशैली घातक
आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्येदेखील तरुणवर्गातील कर्करोगाच्या वाढीस बदललेली अनारोग्यकारक जीवनशैली आणि शर्करायुक्त शीतपेयांचा वाढता वापर हेच सर्वाधिक घातक घटक ठरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आठवड्यातून दोनदा शीतपेय किवा दररोज किमान एक शीतपेयदेखील या आजाराला निमंत्रण ठरत असल्याचा निष्कर्ष पाहणीअंती काढण्यात आला आहे. त्याशिवाय कोणताही ताळमेळ नसलेली जीवनशैली, सतत बाहेरचे अन्न हे सर्वाधिक घातक ठरत आहे.
आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांपैकी २५ ते ३० टक्के रुग्ण हे २० ते ५० वयोगटातील आहेत. तंबाखू, गुटख्यासह प्रदूषित वातावरण, भाज्या, फळांवरील पेस्टीसाइड्सचा वाढलेला वापर हे घटक थेट गुणसूत्रावरच परिणाम करत असल्याने तरुणांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ञ् डॉक्टर सांगत आहेत.
तरुणाईत कॅन्सरचे प्रमाण वाढण्यामागे तबाखूचे सेवन, पर्यावरणीय बदल, बदललेली जीवनशैलीच कारणीभूत ठरल्याचे दिसून येत आहे. हे प्रमाण तब्बल १५ ते २० टक्के अधिक आहे. त्यामुळे तरुणाईने आपल्या जीवनशैलीतील अयोग्य बाबींना टाळण्याची गरज निर्माण झाल्याचे हि सांगत आहे.