मुंबई APMC फळ मार्केटमध्ये फळांचा राजा "देवगड हापूस" दाखल !
नवी मुंबई :फळबागा अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने एक ना अनेक समस्या निर्माण केल्या होत्या. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार, आंब्याचा हंगामही लांबणीवर पडणार अशा शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र, जगभरातील आंबा खवय्यांची निराशा फळांचा राजा असलेल्या देवगडच्या (Mango Fruit Crop) हापूसने केलेले नाही. उलट प्रतिकूल परस्थितीमध्ये यंदा या आंब्याचे डिसेंबर महिन्यातच मुंबई (APMC) बाजारपेठेत आगमन होत आहे. आंबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. फळांचा राजा आंब्याची चव यंदा खवय्यांना लवकर चाखायला मिळणार आहे. यावर्षी चा कोकणच्या हापूस आंब्याची पहिली पेटी  मुंबई  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली असून कोकणातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावातील वाळकेवाडी येथील शेतकरी अरविद वाळके यांनी हा आंबा आणलाय. या हंगामातील पाहिले 25 डझन आंबे आज बाजार समितीमध्ये दाखल झाले असून या आंब्याची व्यापाऱ्यांकडून पूजा करत विक्रीसाठी ठेवण्यात आले. या आंब्याच्या एक डझनला चार ते पाच हजार रुपयांचा भाव मिळालाय. या महिन्यात त्याच्या शेतातून 50 पेट्या आंबा मार्केट मद्ये येणार आहे.
 
वाळकेवाडी गावच्या शेतकऱ्याला मिळाला मान
कुण्या शेतकऱ्याचा हापूस आंबा बाजारपेठेत सर्वाच आगोदर पोहचतो या देखील एक वेगळे महत्व असते. तीन महिन्यापूर्वीच देवगड तालुक्यातील वाळकेवाडी येथील शेतकरी अरविंद वाळके यांच्या आंब्याला मोहोर लागला होता. त्यानंतर योग्य जोपासना केल्यामुळेच आज हापूस आंब्याच्या 5 पेट्या मुंबई बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. गेल्या 5 वर्षात डिसेंबरमध्ये पहिल्या मोहोरचा आंबा मुंबई बाजारपेठेत आलेलाच नव्हता. मात्र, यावेळी प्रतिकूल परस्थितीमध्येही लवकर आंबा दाखल झाला आहे.
ही सुरवात, मात्र फेब्रुवारीपासूनच खरा हंगाम
मंगळारी जरी हापूस आंब्याच्या 5 पेट्या दाखल होणार असल्या तरी हंगामाची खरी सुरवात ही फेब्रुवारीपासूनच होणार आहे. सध्या दाखल होत असलेला आंबा हा सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये मोहोर लागलेला आंबा आहे. त्यानंतर मात्र, अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात मोहोरगळ झाली होती. यामुळे उत्पादनातही मोठी घट झाली आहे. याचा परिणाम आंब्याच्या किंमतीवरही होणार असल्याचे बोलले जात आहे. ही सुरवात झाली असली तरी फेब्रुवारी-मार्च पासूनच खरा हंगाम सुरु होणार आहे.
बहरात असलेल्या आंबा पिकाला अवकाळीचा फटका
यंदा आंबा पिकासाठी सर्वकाही पोषक वातावरण होते. मोहोराने झाडे लगडली होती. त्यामुळे उत्पादनात वाढ होणार असल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत होते. मात्र, अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे आंब्याचा मोहोर गळाला व न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. लवकर सुरु होणारा हंगाम लांबणीवर पडलेला असल्याने उशिराच संपणारही आहे. यामुळे आंबा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तीन टप्प्यांमध्ये होते आवक
कोकणातील हापूस आंब्याची तीन टप्प्यांमध्ये फूट होते. पहिला मोहोर हा सप्टेंबर आणि दुसरा मोहोर नोव्हेंबर-डिसेंबर तर तिसरा आणि शेवटचा मोहोर हा जानेवारी महिन्यात असतो. त्यानुसार आंब्याची आवक बाजारपेठेमध्ये सुरु होते. आता जी आवक सुरु होणार आहे तरी पहिल्या टप्प्यातील आहे. वातावरणात बदलाचा फटका हा दुसऱ्या टप्प्यातील मोहोराला बसलेला आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मोहोराचे नुकसान झाले असले तरी तिसऱ्या टप्प्यातील मोहोर चांगलाच बहरलेला आहे. त्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी तिसऱ्या टप्प्यात नुकसान काही प्रमाणात नुकसान भरुन निघणार आहे.