भारतातून तांदूळ, भाजीपाला, कडधान्ये निर्यात वाढली
भारतीय कृषी आणि प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्यात यंदा मोठ्या प्रमाणात वाढली. यंदा भारतातून बिगर बासमती तांदूळ ,बासमती तांदूळ, ताजा भाजीपाला , पोल्ट्री उत्पादने, कडधान्ये आणि डेअरी उत्पादनांची निर्यातीत वाढ झाली. एप्रिल ते जानेवारी या १० महिन्यांमध्ये भारताची निर्यात १० टक्क्यांनी वाढल्याचे अपेडाने स्पष्ट केले.देशातून यंदा कृषी आणि प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्यात उद्दीष्टापेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. अपेडाने यंदा २ हजार ३५६ कोटी डाॅलर निर्यातीचे उद्दीष्ट ठेवले होते.चालू वर्षात पहिल्या १० महिन्यांमध्ये म्हणजेच एप्रिल ते जानेवारी या काळात देशातून २ हजार १७९ कोटी डाॅलरची निर्यात झाली होती. तर मागील वर्षात याच काळातील निर्यात १ हजा ९७५ कोटी डाॅलरची होती. म्हणजेच यंदा पहिल्या १० महिन्यांतील निर्यात १० टक्क्यांनी वाढली.