गृहिणींना बसणार मसाल्याच्या मिरचीचा ठसका!
मसाल्याच्या मिरची महागल्याने मसाला कसा बनवणार गृहिणींचा प्रश्न?
सर्वच जातीच्या मिरच्यांचे दर ३० ते ४० टक्यांनी वाढले
मुंबई apmc मसाला मार्केट मध्ये दिवसाला ८ ते १० गाड्यांची आवक
मसाल्यासाठी लागणाऱ्या मिरचीचे उत्पादन कमी
उन्हाळा सुरू झाल्यामुळे आता गृहिणींची आगोटची तयारी सुरू झाली आहे. त्यात प्राधान्याने वर्षभर पुरेल इतका लाल मसाला तयार करण्यासाठी लगबग आहे. त्यामुळे बाजारात आता मसाल्याच्या मिरच्यांना मागणी वाढली आहे. मात्र यावर्षी मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात मसाल्यासाठी लागणाऱ्या लाल मिरच्या कमी प्रमाणात दिसत आहेत. परंतु दुसरीकडे या मिरच्यांची मागणी वाढल्याने, त्यांच्या दरात वाढ झाली आहे.
मुंबई apmc मसाला मार्केट मध्ये मिरची आणि मसाल्याच्या पदार्थांची आवक फेब्रुवारी-मार्च महिन्यात वाढू लागते. एकेकाळी या हंगामात मसाला मार्केट मध्ये मिरच्यांचा ८० ते १०० गाड्यांची आवक दिवसाला होत होती. मात्र आता   ही आवक दिवसाला अवघ्या ३० ते ४० गाड्यांवर आली आहे . त्यातच या वर्षी मसाल्यासाठी लागणाऱ्या मिरचीचे उत्पादन कमी असल्याने, बाजारात मिरची कमी प्रमाणात येत आहे.
मसाल्यासाठी अख्खा गरम मसालाही लागतो. या अख्ख्या गरम मसाल्याचे दर स्थिर आहेत. मात्र मसाल्यात मुख्य घटक मिरची हाच असतो. तीच महागल्याने मसाला कसा बनवणार हा मोठा प्रश्न गृहिणींना पडला आहे.
मिरचीचे दर (किलोमागे) गेल्या वर्षी आणि आता
- लवंगी २०० ते २३० रु. ४०० ते ४५० रु.
- बेडगी ३३० ते ३५० रु. ५०० ते ६०० रु.
- पांडी मिरची २२० रु. ३०० ते ३५० रु.
- काश्मिरी मिरची ४५० रु. ६०० ते ६५० रु.
- शंकेश्वरी ४८० रु. १००० ते १२०० रु.