Onion Farmer : कांदा निर्यात बंद झाल्याने भावात घसरण ;कांदा साठवणूक करणाऱ्यांकडून शेतकऱ्यांना केला जातो दिशाभूल!
कांद्याची निर्यात बंद नाही
कांदा साठवणूक   करणाऱ्या दलालांकडून   शेतकऱ्यांची मोठी लूट!
शेतकऱ्यांना दिशाभूल करणाऱ्या या दलालांपासून सावध राहा
शेतकऱ्यांकडून कौडीमाल भावाने खरीदी करून दुप्पट तिप्पट भावाने विक्री  
कांद्यावरून फक्त राजकारण! शेतकऱ्यांना आश्वासनांचे गाजर
आख्यात देशात आर्थिक परिस्थिती बिगडल्याने निर्यातदार कांदा निर्यात कमी केले  
पहिल्या   निर्यातदार २० ते ३० कंटेनर पाठवायचं   आता ५ ते ६ वर आले आहे
नवी मुंबई : सध्या कांद्यावरून गल्ली ते दिल्ली पर्यंत राजकरण सुरु आहे ,कांद्याच्या उत्पादनात वाढ झाल्याने दरात मोठी   घसरण झाली आहे.याचा फटका शेतकऱ्यांना   बसला आहे.   यामध्ये असे सांगण्यात येत आहे कि कांद्याची निर्यात बंद झाल्याने कांदाच्या दरात घसरण झाली आहे मात्र आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कि कांदा च्या मागील   राजकारण काय सुरु आहे पाहूया या रिपोर्ट मध्ये.
राज्याच्या बरोबर गुजरात ,राजस्थान आणि मध्यप्रदेश मध्ये कांद्याची उतपादन वाढले आहेत.उत्पादन वाढून मालाला उठाव नाही त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार समिती मध्ये चांगले भाव मिळत नाही .कांदा शेतकऱ्यांना अशे सांगण्यात येत आहे कि कांद्याच्या निर्यत बंद झाल्याने दरात घसरण होत आहे. पण या मागच्या राजकारणाचा खळबळजनक खुलासा मुंबई APMC कांदा बटाटा घाऊक व्यापारी मनोहर तोतलानी यांनी   केला आहे..तो म्हणजे राज्यातील मोठं मोठे दलाल   शेतकऱ्याकडून कवडीमोल भावात कांदा खरीदी करून साठवणूक करतात.कांद्याच्या भाव कधी मिळणार या दलालांना अगोदर माहिती असतात . दोन ते तीन महिन्यात हाच कांदा दुप्पट ते तिप्पट भावाने विक्री करतात असल्याचा दावा   तोतलानी यांनी   केला आहे, तोतलानी यांनी पुढे सांगितले कि भारतात कांद्यावर निर्यात बंदी नाही . कांद्याची निर्यात सुरूच आहे.. जे निर्यातदार परदेशात कांद्याची २० ते ३० टक्के निर्यात करत होते ते आता ५ ते १० टक्क्यांवर आली आहे .काही निर्यातदार याना आख्यात देशात पैसे मिळत नसल्याने त्यांनी निर्यात बंद केली आहे आणि सध्या परदेशात आर्थिक   स्थिती खालावली आहे . त्यामुळे कांदयाला योग्य हमीभाव मिळत नाही .सध्या याचा फायदा   राज्यातील मोठं मोठे दलाल घेत आहे , शेतकऱ्याकडून कवडीमोल भावात कांदा खरीदी करणार आणि तो   साठा   करून ठेवणार त्यानंतर दोन महिन्यात हाच कांदा दुप्पट ते तिप्पट भावाने विक्री करणार असल्याचा दावा   तोतलानी यांनी   केला आहे ..त्यामुळे शेतकऱ्यांनी अश्या   दलालांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे,शेतकऱ्यांनो तुम्ही अश्या दलालांपासून सावध राहा दोन महिन्यात तुमच्या कांद्याला   चांगला भाव मिळणार असा दावा तोतलानी यांनी केला आहे. 
कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे. अधिवेशनात कांदा प्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडच्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आल्याचे आश्वासन दिले मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र दिसून आले. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी संतप्त झाला असून कुठे बाजार समितीत तर कुठे रस्त्यावर कांदा फेकून तर कुठे कांद्याची होळी करून तो आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवतोय. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनातही विरोधकांनी कांदा प्रश्न वरून आक्रमक पवित्रा घेतल्याने सरकारची चांगलीच अडवणूक झाली आहे.
राज्यात कांद्याला अगदी कवडीमाेल भाव मिळत आहे मात्र याच कांद्याला परदेशात साेन्याचा भाव आला आहे. भारतात कांद्याची किंमत काेसळली असताना अनेक देशांमध्ये तब्बल ७५० टक्क्यांनी कांदा महाग झाला आहे. फिलिपाईन्समध्ये कांद्याचा भाव २.५ हजार रुपये किलाेपर्यंत गेला आहे. भूकंपग्रस्त तुर्कीपासून पाकिस्तान, कजाकिस्तान इत्यादी देशांमध्ये कांदा जनतेला रडवित आहे.. युरोपियन   देशांमध्ये दुष्काळाचा फटका असल्यामुळे कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे. पाकिस्तानात गेल्यावर्षी महापुराचा फटका बसला. याशिवाय कडाक्याच्या थंडीनेही मध्य आशियातील कांदा पिकाचे नुकसान केले आहे.