Apmc मधील नव्या गव्हाची आवक सुरु दररोज सरासरी 800 ते 1 हजार क्विंटल गहू बाजारात दाखल
नंदुरबार : नंदुरबार Apmc मधील नव्या गव्हाची आवक सुरु झाली आहे. दररोज सरासरी 800 ते 1 हजार क्विंटल गहू बाजारात येत आहे. आवक कमी असल्याने गहू पीकाला सध्या भाव 2100 ते 3000 रुपये पर्यंत मिळत आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाजारात गव्हाची आवक वाढणार असल्याचा सुध्दा अंदाज व्यक्त केला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामात (Rabi season)गहूचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर होत असतं, रब्बीच्या एकूण क्षेत्रापैकी 70 टक्के क्षेत्र गव्हाचे आहे. यंदा सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता असल्याने, एकूण क्षेत्राच्या तुलनेत गव्हाची पेरणी (Sowing wheat) करण्यात आली होती. आता गहू काढणी सुरू झाली आहे. काही शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी गहू आणायला सुरुवात केली आहे. मात्र गव्हाची आवक वाढल्याने गव्हाचा भाव कमी व्हायला नको, अशी अपेक्षा शेतकरी करू लागले आहेत.