शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आज PM किसानचा तेरावा हफ्ता होणार जमा
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आज PM किसानचा तेरावा हफ्ता होणार जमा
शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. २७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तेरावा हफ्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याची प्रतिक्षा होती. अखेर आज PM किसान योजनेचा तेरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. दरम्यान,EKYC पूर्तता करणारे आणि ज्यांचे आधार बँक खात्याला संलग्न आहे, त्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. चार महिन्यांच्या अंतराने दोन दोन हजार रुपये करुन, ही रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत १२ हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आज तेरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
PM किसानच्या रकमेत वाढ केली जाण्याची चर्चा:
गेल्या काही दिवसांपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ होण्याच्या संदर्भात चर्चा सुरु होती. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, ही मदत आता आठ हजार रुपये होणार असल्याची चर्चा सुरु होती. पंतप्रधान सन्मान निधीची रक्कम वाढणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यासंदर्भात   PM किसान सन्मान निधीत वाढ केली जाणार नसल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. कृषीमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या तरी PM किसान सन्मान निधीचा हफ्ताची रक्कम वाढण्याची शक्यता दिसत नाही.