माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या नावाने मुंबई Apmc संचालक करतात शेतकऱ्यांना फसवणुक
मुंबई Apmc मसाला मार्केटतील बेदाण्याच्या लिलाव गृहात शेतकऱ्याची फसवणुक
लिलाव गृहात बेदनाच्या जागेवर खजूर
मुंबई APMC संचालक   आपल्या फायदासाठी शेतकऱ्यांची करतात फसवणूक
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विश्वासात घेऊन संचालकांनि केली शेतकऱ्यांची हिरमोड
मुंबई apmc बेदाणा लिलाव केंद्रात   बेदाण्याला हमीभाव नसल्याने शेतकरी निराश
मोठ्या थाटात सुरु करण्यात आलेले बेदाणा लिलाव केंद्र बनले फसवणुकीचे केंद्र
बेदाण्याच्या लिलाव गृहात बेदाण्याऐवजी खजुराची विक्री  
बेदाणा लिलावगृह फक्त बेदाण्यासाठीच असावा शेतकऱ्यांची मागणी
Anchor: राज्यातील सर्व बाजार समित्यांचा कारभार शेतकऱ्यांमुळेच चालतो. त्यामुळे शेतकरी सुखी-समाधानी आहे का याचा विचार होणे गरजेचे आहे. परंतु या शेतकऱ्यांना मुंबई Apmc संचालक कडून फसवणुक सुरु झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
मुंबई APMC   मसाला मार्केट मध्ये ९ मार्च रोजी माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बेदाणा लिलाव केंद्राचे उदघाटन मोठया थाटात करण्यात आले होते ... हा स्वतंत्र लिलाव केंद्र मसाला मार्केट संचालक विजय भुता यांच्या गाळ्यात सुरु करण्यात आले... मात्र आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की या बेदाण्याच्या लिलाव गृहात बेदाणा एवजी खजुराची विक्री मोठ्या संख्येने होत आहे .त्यामुळे हा लिलाव केंद्र बेदाणासाठी आहे कि खजुरासाठी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे .
पंढरपूर ते मुंबई Apmc मसाला मार्केटच्या ५०० किलो मिटर प्रवास करून येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला अवघे ५ ते १० रुपये मिळत असल्याने शेतकरी निराश होऊन आपला शेतमाल परत घेऊन न जाता आपले नुकसान करून कवडीमोल भावात विकून टाकतात .. या स्वतंत्र बेदाणा लिलावगृहात तुम्ही आत प्रवेश केला तर तुम्हाला बेदाण्याऐवजी खजूर बघायला मिळणार ... याचाच अर्थ मार्केट   संचालकांनी आपल्या फायदासाठी   शेतकऱ्यांच्या नावाखाली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची   दिशाभूल करून आपल्या गाळ्यावर स्वतंत्र लिलाव केंद्र सुरु करून माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अधक्ष्य शरद पवार यांच्या सोबतच शेतकऱ्यांची फसवणूक सुरु केली आहे .. त्यामुळे या लिलावगृहात शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे असे दिसून येत आहे.. सर्वात महत्वाची बाब अशी आहे कि हे लिलाव गृह चालवण्यासाठी मुंबई कृषी उत्पन बाजार समिती या पणन संचालकांची   कुठली ही परवानगी नाही त्यामुळे बाजार आवारात शेतकऱ्यांना फसवणूक झाली   तर यांची जबाबदार कोण ? असे प्रश्न उपस्थित होत आहे .
मुंबई Apmc मसाला मार्केट मध्ये ड्रायफ्रुटस दुकाने जवळपास ३०० आहेत त्यामुळे इथे वेदानाच्या लिलाव केंद्र सुरु करायचं ज्यामुळेशेतकऱ्यांना फायदा होणार असे संचालक विजय भुत्ता यांनी माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष्य शरद पवारांना विश्वासात घेतल.आणि बेदाणा लिलाव केंद्राचे शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन झाले.. शरद पवार साहेब आमच्यासाठी दैवत आहेत .त्यांची उदघाटन केलेल्या बेदाणा लिलाव केंद्राची बातमी बघून आम्ही शेतकऱ्याने मुंबई APMC मसाला मार्केट मध्ये आपला शेतमाल बेदाणा विक्री साठी आलो . आम्ही या ठिकाणी लिलावासाठी सव्वा दोन टन बेदाने आणले परंतु पंढरपूर मध्ये मिळणाऱ्या हमीभावापेक्षा फक्त १० रुपये जास्त भाव मिळाल्याने संभाजी शिंदे या शेतकऱ्याची निराशा झाली आहे .. बेदाण्याला भाव मिळाला नाही तर आहे त्या दरातच विक्री करणार असल्याचे   APMC न्यूज ला शेतकरी संभाजी शिंदे यांनी सांगितले ... सोबतच बेदाणा लिलाव केंद्र फक्त बेदाणा लीलावस व्हायला हवा परंतु या बेदाणा लिलावगृहात खजूर व आणखी सुकामेवा विक्री होत असल्याने शेतकऱ्यांसाठी मोठे स्टोरेज उपलब्ध करून द्यावे व्हावे अशी मागणी शेतकरी गणपत महादेव शिंदे   यांनी केली आहे ..त्यामुळे संचालक यांनी शेतकऱ्यासाठी नाही आपल्या फायदासाठी सुरु केलेल्या हा स्वतंत्र लिलाव केंद्र वेकायदेशीर असून यावर त्वरीत कारवाई करावी आणि बाजार समिती कडे असणाऱ्या eNAM केंद्रावर सुरु करावी अशी प्रतीक्तिया काही शेतकऱ्याने दिले आहे .
मुंबई कृषी उत्पन बाजार समितीच्या ई-लिलावगृहामध्ये जवळपास आठ संगणक व एलईडी टीव्ही बसविण्यात आले आहे. या ठिकाणी पूर्णपणे ऑनलाइन शेतमालाची खरेदी व विक्री करता येईल, अशी सुविधा आहे परंतु ४ वर्षापासून प्रत्यक्षात त्याचा वापर करण्यात आलेला नाही. कार्यालय धूळखात पडून असून बाजार समितीला भेट देण्यासाठी येणारे मंत्री व इतर शिष्टमंडळाला दाखविण्यापुरताच त्याचा उपयोग केला जातो.
या लिलाव केंद्रात शेतकरी आपल्या बेदण्याचे नमुने पाठून किव्हा ज्यां शेतकऱ्यांना शक्य असेल ते प्रत्यक्ष लिलावात सहभागी होतील आणि व्यापारी आपला दर सांगतील तर शेतकरी आपल्या पसंतीच्या किमतीला संमती देतील अशी लिलाव पद्धती ठरवण्यात आली.. परंतु व्यापारी शेतकऱ्यांना योग्य तो हमीभाव न देता तोंड रक्कम सांगून शेतकऱ्यांना निराश करत आहेत..