रब्बी हंगामातील पिकांवर बळीराजा अवलंबून..
रब्बी हंगामातील पिकांवर बळीराजा अवलंबून..
रब्बी हंगामातील पिकांना चांगला भाव मिळावा, यासाठी बळीराजा अपेक्षा लावून आहे. खरीप हंगामातील पिकांना हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली होती. मात्र आता रब्बी हंगामातील पिकांना चांगला भाव मिळणार का असं काहीसं प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन आणि मिरचीला सुरुवातीला चांगला भाव मिळाला होता. मात्र आवक वाढल्याने दरात चांगलीच घसरण झाली होती. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आला असला तरी देखील अपेक्षित भाव मिळाला नाही आहे. कापसाला सध्या ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० पर्यंतच्या भाव मिळत आहे. तर मिरचीला ३ हजारांपासून तर ५ हजार ५०० भाव आहे. त्यामुळे आता रब्बी हंगामातील पिकांवर बळीराजा अवलंबून आहे.
शेती पिकाला हमीभाव मिळावा :
खरीप हंगामातील पिकाप्रमाणेच रब्बी हंगामातील कांद्याची परिस्थिती झाली आहे. कांद्यावर केलेला खर्च देखील निघणार नसल्याची परिस्थिती शेतकऱ्यांसमोर झाली आहे. कांद्याला चार ते पाच रुपये किलो दर शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे शासनाने या गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाला आहे. राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी इतर प्रश्नांप्रमाणेच शेतकऱ्यांच्या प्रश्न देखील गांभीर्याने घेऊन मार्ग लावला पाहिजे. मागील अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक विषयांवर खडाजंगी रंगली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूलाच राहिले होते. आता शेती पिकाला हमीभाव मिळावा, हा प्रश्न देखील मार्गी लावा अशी अपेक्षा बळीराजाला लागली आहे.