अवकाळी पावसाचा फटका मुंबई AmcPMC वर - भाज्यांचे दरांत वाढ
नवी मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे... त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे..मुंबई apmc भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक कमी झाल्याने दरात   वाढ झाली आहे .. भाज्यांच्या दरात वाढ होऊनही शेतकऱ्याला मातीमोल भावाने आपला शेतमाल व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे..भाज्यांच्या दरवाढीचा फायदा ना शेतकऱ्यांना आहे ना ग्राहकांना... मात्र मध्यस्ती असलेले व्यापारीच अधिकचा नफा कमावत आहेत. पिकवणाऱ्यापेक्षा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच अधिकचा फायदा होताना दिसून येत आहे.
मुंबई   APMC   भाजीपाला मार्केटमध्ये   एकूण ६०० गाड्यांची आवक झाली आहे ..   घाऊक बाजारात   भाज्यांच्या दरात   कितीने वाढ झाली आहे जाणून घेऊया ..भाजीपाला मार्केटमध्ये आज मेथी १५ रूपये ,कांदापात   १५ ते २० , शेपू १५ रुपये , भोपळा २५ रुपये, शिमला २५ ते ३० रुपये   .   तसेच मटार ४० रुपये , भेंडी ४६ रुपये , गवार ७० रुपये ,   फरसबी ५० रुपये,   कोबीचा दर १० रुपये किलो आहे , फ्लॉवर १५ रुपये, टोमॅटो १५ रुपये, मिरची ४० ते ४५ रुपया प्रतिकिलोने   विक्री होत आहे..