अवकाळी पाऊसामुळे, शेतकऱ्यांची तारांबळ रब्बी पिकांना जोरदार फटका बसण्याची शक्यता
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यामुळं शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस पडत आहे. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. बुलढाणा जिल्ह्यासह परभणीत   जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सध्या गहू, हरभरा, कांदा काढणीचे दिवस आहेत. मात्र, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे.पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच पिंपरी चिंचवड, सातारा, धुळे, वर्धा या जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर ठाणे तर मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणा पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे उकाड्याने हैराणा झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याचीही शक्यता आहे.
18 मार्चपर्यंत राज्यात पावसाचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 मार्च ते 18 मार्च या दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे   शेती पिकांना फटका बसत आहे.अशातच आता पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सध्या कांदा, गहू, हरभरा या पिकांची काढणी सुरु आहे. अशातच पाऊस आल्यास पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिवसाच्या कमाल तापमानातही दोन अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकरी बांधवांनी पावसाची शक्यता घेऊन हरभरा, गहू पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.