APMC NEWS IMPACT: मुंबई APMC फळ मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या नावाने कर्नाटक आंबा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कारवाई
1. ज्या राज्यातून आंबा येणार,ज्या नावाने त्याची आवक होणार, त्याच नावाने विक्री करण्याचे आदेश
2. फळ मार्केटचे उपसचिव यांनी काढले   ग्राहकांची फसवणूक   न करण्याचे आदेश
3. फळ मार्केटमध्ये हापूच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विक्री करून ग्राहकांची फसवणूक!
नवी मुंबई : मुंबई APMC फळ मार्केट्मधे कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्याची [Hapoos Mango]   देवगड, रत्नागिरी येथून आवक सुरु झाली असून मार्केट मध्ये सुमारे १२ हजार हापूसच्या पेट्या दाखल होत   आहेत.. त्याशिवाय केरळ व कर्नाटकातूनही आंबा येतो.कोकणातील आंब्यांना सर्वाधिक मागणी असते. म्हणूनच या आंब्याच्या किंमतीही जास्त असतात. याचा फायदा घेत मुंबई APMC फळ मार्केट मध्ये जवळपास ५० टक्के   व्यापारी, विक्रेते नागरिकांची फसवणूक   करतात. आंब्यांची अदलाबदल करून विक्री करतात .हापूसच्या पेट्यात कर्नाटक आंब्या भरून विक्री करतात . हंगामाच्या सुरवातीलाच असा विचित्र प्रकार बाजार आवारात दिसून आला.. कोकणातल्या हापूसचा भाव   ४ ते ८ डझन पेटीला २ हजार ते ६ हजार रुपयांना विकली जात आहे..   तर कर्नाटकच्या आंब्याचा भाव २०० ते ३०० रुपये किलोने   विकला जात आहे... दामदुप्पट पैसे मोजून खरेदी केलेला हापूस ड्युप्लिकेट तर नाही ना?   यावरचा एक खास रिपोर्ट Apmc News digital चॅनेल ने   दाखवला होता.. या बातमीची दखल फळ मार्केटचे उपसचिव संगीत अंडांगळे यांनी घेतली आहे त्यानुसार फळ मार्केटच्या व्यपाऱ्याना   आदेश काढण्यात आले आहेत ..
फळ बाजार आवारातील व्यापाऱ्यांकडे येत असलेला आंबा हा त्या त्या राज्याच्या नावासह व आंब्याच्या जातीसह विक्री न करता तो महाराष्ट्रीयन हापूस या नावाने बाजार आवारात विक्री होऊन ग्राहकाची फसवणूक करत असतात,फळ बाजार आवारात मोठया प्रमाणावर आवक होत असलेला आंबा हा ज्या राज्यातून आला आहे   व ज्या नावाने त्याची आवक होईल, त्याच नावाने त्याची विक्री करा आणि त्या आंब्यावर लेव्हल लावा , याबाबतची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर अश्याप्रकारची फसवणूक करून परराज्यातून आलेला आंबा हा त्या राज्याच्या व आंबाच्या जातीने विक्री होत नसल्याचे आढळून आल्यास किंव्हा याबाबतची तक्रार आल्यास व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,   असे फळ मार्केटचे उपसचिव यांनी सांगितले आहे ..  
मुंबई apmc फळ मार्केटमध्ये जवळपास ८० टक्के व्यापारी बाहेरचे आहेत आणि ते आंबा हंगामात व्यपाऱ्याचा गाळा भाडेतत्वावर घेऊन व्यापार करत असतात. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे रात्रीच्या अंधारात हि टोळी आंब्यांची अदलाबदली करून सगळ्या विंग मध्ये पाठवतात . यावर कसा अंकुश लागणार ?   फळ मार्केटचे उपसचिव यांनी काढलेल्या आदेशाचे पालन होईल का ? याकडे बघणे महत्वाचे ठरणार आहे.. कारण व्यापारी रत्नागिरी किंवा देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकचा आंबा विक्री करत असेल तर यामध्ये ग्राहकवर्गाची मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ..