“व्यापारी आला,सौदा पण झाला आणि अचानक गारांचा पाऊस आला”; शेतकऱ्यांचं दुःख संपता संपेना..
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीकडे पाहून आता शेतकऱ्यांना आता अश्रू अनावार झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक द्राक्षबागा पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे भूईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता झालेल्या नुकसानीचे सरकारने पंचनामे करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावातील टरबूज उत्पादक शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. अवकाळीमुळे द्राक्षे, गहू, मका, गहू आणि टरबूज पिकांचे नुकसान झाल्याने आता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरुन कसे निघणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील भोरमधील दिगंबर सुरवसे या अल्पभूधारक शेतकऱ्याचेही तीन एकरावरील टरबूज मातीमोल झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अवकाळी पावसामध्ये झालेल्या नुकसानीचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला आहे. शेतीतील पीकच पावसामुळे भूईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून कसं निघणार असा प्रश्न निर्माण झालेला असतानाच आता या नुकसानीचे पंचनामे होणार का असा सवालही शेतकरी उपस्थित करत आहेत.
अवकाळी पावसात नुकसान झालेल्या पिकांचे नुकसान झाल्याने आणि पीकं भूईसपाट झाल्याने आमच्या कष्टाने आम्ही पिकवले, निसर्गाने दिले आणि पुन्हा हिरावून घेतले.
त्यामुळे कोणाला दोष देणार असा भावूक सवाल बळीराजा करत आहे.नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, पैसे खर्च करून लावलेल्या टरबूज पिकाचे या अवकाळीमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आता केलेला खर्चही निघणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
शेतीचे झालेल्या नुकसानीमुळे मोठा फटका बसला आहे. त्यातच चार दिवसापूर्वी व्यापारी आला आणि सौदा पण झाला मात्र काल अचानक गारांचा पाऊस आला आणि हाताचा घास हिरवला गेला असंही शेतकऱ्यांनी सांगितले आहे.