सांगलीतील बाहुबली कांदा भाव खातोय!
सांगलीतील बाहुबली कांदा 'भाव' खातोय!
- एकाच कांद्याचे वजन तब्बल पाऊण किलो
- सांगलीच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे कौतुक
- कांदा पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी
कांद्याचा भाव मातीमोल झाल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात सध्या कांद्याच्या गडगडलेल्या दरामुळे कांद्यावरून राजकारण पेटले आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत असतानाच सांगलीतील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याची मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे. पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळमधील हनुमंत शिरगावे या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये कांद्याचे उत्पादन घेतले आहे. त्यांनी घेतलेल्या कांद्याच्या पीकात एक कांदा तब्बल पाऊण किलो वजनाचा आहे. हा कांदा पाहण्यासाठी शिरगावे यांच्या शेतात शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. शेतात कांदा पाहण्यासाठी आलेले लोक कांद्याला पाहून हा कांदा आहे की कांदोबा असे आपसूक बोलत आहेत.त्यामुळे राज्यात सध्या गडगडलेल्या दरामुळे कांदा चांगला चर्चेत आला आहे. त्याच बाजूला सांगलीच्या या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मात्र कौतुक होत आहे.