कांदा गडगडला! नव्या दराने बळीराजा उपाशी, भाव वाचून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
कांदा गडगडला! नव्या दराने बळीराजा उपाशी, भाव वाचून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
नवी मुंबई:कांदा म्हटलं की प्रत्येकाच्या स्वयंपाक घरातील राजा आहे. भाज्यांपासून मासाल्यापर्यंत ते थेट कोशिंबीरचा हा अविभाज्य घटक असल्याने जेवणामध्ये कांदा महत्त्वाचा आहे. पण आता कांद्याचे भाव इतके वाढले की सुगरणींच्या स्वयंपाक घरापासून ते हॉटेल व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी येईल. याच कांद्याचे भाव वाढल्यानंतर राज्य सरकारसमोरील अडचणीही वाढतात आणि कांद्याचे भाव गडगडल्यानंतर शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी येते.
सध्या नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. पण कांद्याचे दर मात्र गडगडले आहेत. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल रविवारी सुमारे २०० क्विंटल कांद्याची आवक झाली. या कांद्याला ४०० ते ८०० रुपये क्विंटल म्हणजे चार ते आठ रुपये किलोपर्यंतचाच भाव मिळाला. यातून कांद्यावर झालेला खर्च आणि वाहतूक खर्चही निघणे कठीण आहे. परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे कांद्यातून चार पैसे हाती येतील अशी आशा शेतकऱ्यांना होती.
कष्टांनी पिकविलेला कांदा चार ते आठ रुपये किलोने ठोक बाजारात आणून विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. दुसरीकडे मुंबई Apmc कांदा बटाट घाऊक बाजारात हाच कांदा दहा ते पंधरा रुपये किलोने विक्री केला जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना ,किरकोळ विक्रेते कांद्यातून नफा होत असून शेतकऱ्यांना मात्र कांद्याचा भाव मिळत नसल्याचे चित्र आहे.