नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्थानकांबाहेर पोटच्या तीन मुलांची विक्री; आरोपी दाम्पत्याला अटक
नवी मुंबई येथील नेरूळ रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे दाम्पत्य पोटाच्या पोरांची विक्री करत असल्याचा धक्कादायक  प्रकार  समोर आला आहे. हे दाम्पत्य   मुलांना जन्म देऊन त्यांची विक्री करत असे. हा गंभीर प्रकार महिला बाल विकास विभाग ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या घटनेची माहिती मिळताच महिला बाल विकास विभाग आणि नवी मुंबई पोलिस आरोपींना पकडण्यासाठी गेले असता आरोपी आईला अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिस पथकाने त्याला सुद्धा त्याबात घेतले आहे. आईची कसून चौकशी केली असता, पहिली मुलगी ९० हजार, दुसरी २ लाख रुपयांना विकल्याचे तीन सांगितले. तर तिसरा मुलगा मात्र कुठे विकला याबाबत अजून काही समजले नाही. तर दोन मुलांचा शोध लागला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर तिसऱ्या मुलाचा शोध सुरू असून त्याला शोधण्यासाठी पथक रवाना झाले असल्याचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले आहे.
या जोडप्याने २०१९ मध्ये आपली ३ महिन्यांची मुलगी नवी मुंबईतील एनआरआय परिसरात विकल्याची माहिती तपासात दिली. त्यानुसार ही मुलगी खरेदी करणाऱ्या महिलेचे घर गाठले व ही मुलगी ताब्यात घेण्यात आली. हा व्यवहार ९० हजार रुपयांना झाल्याचे सापडलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले. बाळाची खरेदी व विक्री करणाऱ्या दोघींविरोधात नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या मुलीनंतरचा मुलगा आरोपीने कोठे विकला आहे यांच्या शोध सुरू आहे
नवी मुंबईतील अनेक रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या लोंकांकडून अशा प्रकारे मुले जन्माला घालून त्यांची विक्री केली जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पहिली मुलगी २०१९ मध्ये विकल्याचे माहिती समोर आल्याने गेली अनेक वर्षांपासून हे प्रकार सुरु असल्याचे दिसते. त्यामुळे महिला बाल विकास ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.