मुंबई APMC संचालक मंडळाची बाजार समितीमध्ये येणासाठी चढाओढ सुरु,वाचा या मागील करणे ...
मुंबई APMC संचालक मंडळाची बाजार समितीमध्ये येणासाठी चढाओढ सुरु,वाचा या मागील करणे ...  
नवी मुंबई: गेल्या १० महिन्यांपासून मुंबई APMC तील ७ संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार. सभापती अशोक डक व उपसभापती धनंजय वाडकर यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर संचालक मंडळ कोरम पूर्ण नसल्याने बैठका ठप्प.   संचालक मंडळावर शासन दरबारी व न्यायालयात सुरु असलेली सुनावणी हे सध्या चर्चेचा विषय बनली आहे.आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या मागची कारणे काय आहेत ?
मुंबई APMC मधील   पाचही मार्केट चा पुनर्विकास   व उप बाजारपेठ उभारण्यासाठी जागेची खरेदी होऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक बोली होणार आहे. त्यामुळे संचालक मंडळ अपात्र होउन सुद्धा १० महिन्यापासून बाजार आवार सोडत नाही, त्यासाठी काही पण करेन मात्र आम्हाला बाजार समिती परत द्या .. अशी चित्र सध्या दिसत आहे. पाचही मार्केटमध्ये पावसाळ्यापूर्वी जम्बो कामे मिळून ७० कामे निघाले आहेत,   यामध्ये मोठा प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार आहे .. त्यासाठी संचालक मंडळाकडून बाजार समिती हातातून जाऊ नये यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे ..
सूत्राने सांगितले प्रमाणे   पाचही मार्केटच्या विकास कामासाठी केंद्र सरकार कडून एक हजार कोटीची मदत मिळणार आहे . यामध्ये   मार्केटचा पुनर्विकास ,कोल्ड स्टोरेज बांधणे,शेतकऱ्यासाठी सुविधा असे विविध प्रकल्प होणार आहे. यासाठी संचालक मंडळ बाजारसमितीमध्ये येण्यासाठी चढाओढ करत आहेत . परंतु या संचालक मंडळाने बाजारसमितीमध्ये येउन ३ वर्षात जवळपास २५ ते ३० सभा घेतल्या , मात्र   यावर एकही धोरणात्मक निर्णय झालेला नाही. मार्केटमध्ये जवळपास ३ वर्षापासून १५० कोटींचे प्रकल्प धुळखात पाडलेले आहेत,   याबाबत कुठली हि विक्री झालेली नाही. या ३ वर्षात संचालक मंडळाने फक्त मार्केटमध्ये शेरो शायरी,चाय पे चर्चा,होटल ,जेवण यासर्वांवर APMC च्या तिजोरी मधून लाखो रुपये खर्च केले ,तरी देखील विकासकामे रखडली आहेत आणि आता   पाचही मार्केटमध्ये पावसाळ्यापूर्वीची जम्बो कामे काढण्यात आली आहेत , त्यामुळे संचालकमंडळाची सभा घेण्यासाठी धावपळ सुरु आहे.   यासाठी फोन कॉल,पत्र व्यवहार सुद्धा करण्यात येत आहे .. यावर संचालक मंडळाचे असे म्हणणे आहे कि मान्सूनपूर्वी कामे ,अनुज्ञाती नूतनीकरण ,अशी बरीच कामे रखडली आहेत त्यामुळे सभा लावण्याची गरज आहे ,मात्र हि विकासकामे संचालक मंडळामुळेच रखडली आहेत अशी   प्रतिक्रिया काही बाजार घटकांनी दिली ..या सगळ्या प्रकरणावर पणनमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष्य केंद्रित केल्याचे समजते..   आता यावर लवकरात लवकर मोठा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.