Big Breaking:- परदेशातून नवी मुंबईत आलेल्या तीन रुग्णांना कोरोनाची लागण; नमुने तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात
युकेवरून २९ नोव्हेंबरला नवी मुंबईत आलेल्या प्रवाशाला कोरोनाची लागण झालेली  असतानाच इंग्लंडहून आलेल्या आई आणि मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. संबंधित रुग्णांना ओमायक्रॉन व्हेरिएंटची बाधा झाली आहे का हे तपासण्यासाठी नमुने जिनोम सिक्वेन्सीग एनआयव्हीकडे मुंबईला पाठविण्यात आले आहेत. ओमायक्रॉनचे रुग्ण राज्यात सापडू लागल्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानेही विशेष दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे.
विदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशावर लक्ष ठेवले जात आहे. सर्वांचे घरामध्येच विलगीकरण केले जात आहे. निगेटिव्ह चाचणी आलेल्यांची पुन्हा ८ दिवसांनी चाचणी केली जात आहे. त्यांच्या प्रकृतीची नियमित विचारपूस केली जात आहे. युकेवरून एक प्रवासी २९ डिसेंबरला नवी मुंबईत आला आहे. रविवारी त्याला कोरोना झाल्याचे निदर्शनास आले आहे. तर आज इंग्लंडहून आलेल्या आई आणि मुलाला कोरोना लागण झाल्याचे अहवाल आले असून त्यांना नक्की कोणत्या व्हेरिएंटची बाधा झाली आहे. हे तपासण्यासाठी स्वॅबचे नमुने कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
आरोग्य यंत्रणेचे व शहरवासीयांचे लक्षही त्या अहवालाकडे लागले आहे. कोरोना झालेल्या प्रवाशाच्या पत्नीसही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली असून ती नागपूरमध्ये असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले.
युके आणि इंग्लंडवरून आलेल्या प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोणत्या व्हेरिएंटची लागण झाली आहे हे तपासण्यासाठी नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.