फळ मार्केटमध्ये अनधिकृत बांधकामासाठी मुंबई APMC सचिवांची 'अर्थ' पूर्ण ' अभय' योजना?
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये राजरोजपणे दोन मजले अनधिकृत बांधकाम सुरु
मार्केट संचालक यांच्या J विंग मध्ये अनधिकृत बांधकाम
मार्केट संचालक यांच्या आशीर्वादाने सुरु आहे बांधकाम
मार्केट संचालक स्वतः आपल्या गळ्यावर केले बांधकाम
दोन मजले बांधकाम करून व्यापारी आपले गाळे देतात भाड्यावर
एकीकडे NMMC बाहेर कारवाई करत असताना मार्केटकडे करतात दुर्लक्ष्य  
मार्केट बकाल झाले असून अतिक्रमणांमुळे अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण ?
नवी मुंबई : मुंबई APMC फळमार्केटमध्ये राजरोजपणे अनधिकृत बांधकाम सुरु आहे...हे बांधकाम मार्केट संचालक यांच्या J विंग मध्ये सुरु आहे .   महत्वाची बाब म्हणजे   फळ मार्केट   संचालकांनी   स्वतःच्या गाळ्यामध्ये अनधिकृत बांधकाम केले आहे.संचालकासह व्यापाऱ्यांनी अनधिकृत बांधकाम करून एक ते दोन मजले वाढवल्याने मार्केट बकाळ झाले   आहे..त्यामुळे संचालक आणि मुंबई APMC   सचिव यांनी मार्केटमध्ये अनधिकृत बांधकामासाठी   'अर्थ' पूर्ण' अभय' योजना सुरु केल्याची चर्चा सध्या बाजार आवारात सुरु आहे. 
   
सध्या आंब्याचा हंगामा   सुरु झाला असून मुंबई apmc फळमार्केट मध्ये दिवसात ३० ते ४० हजर पित्याची आवक सुरु आहे तसेच उत्तर फळाची आवक सुरु आहे . मार्केटमध्ये जवळपास ५० हजार लोकांची ये जा सुरु असतात . मार्केट सुरु असताना महापालिका आणि पणन विभागाची कुठल्याही परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम सुरु आहे .   मुंबई APMC   फळ, भाजीपाला,दाना मार्केट आणि   मसाला मार्केट हे चौघे   मार्केट मिळून तीन हजारपेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे उभे राहिले आहेत.. येथे बहुतांश व्यापाऱ्यांनी एका मजल्याचे बांधकाम केले आहे तर   काही व्यापाऱ्यांनी   दोन मजल्यांचे बांधकाम केले आहे...महापालिका तर्फे नोटीस देउन सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही त्यामुळे मार्केट संचालकाच्या आशीर्वादाने बिनधास्तपणे बांधकाम सुरु आहे.   मार्केट मधील व्यापारी अनधितकृत दोन मजले बांधकाम करून आपले गाळे भाडेतत्वार देतात .. NMMC   बाहेर कारवाई करत असते पण मुंबई apmc मार्केट मधील अनधितकृत   बांधकामाकडे दुर्लक्ष्य करताना दिसत आहे .. या फळ मार्केट मध्ये दररोज शेकडो नागरिक येत असता .. व्यापाऱ्यांनी वाढवलेल्या अतिक्रमणांमुळे काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ? असे प्रश्न बाजारघटकां कडून विचारले जात आहेत ..