Big Breaking ! ईडीकडून तब्बल चार तासांच्या चौकशीनंतर सदानंद कदम यांना अटक
सदानंद कदम यांना ईडीकडून अटक, किरीट सोमय्या यांची माहिती
मुंबई: शिंदे गटाचे तडफदार नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे भाऊ सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनीदेखील आता बॅग भरुन तयार राहावं, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. ‘संबंधित प्रकरणात 100हून अधिक कोटींचा घोटाळा झालाय. इतके पैसे आले कुठून?’, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. दापोली रिसॉर्टप्रकरणी ईडीने सदानंद कदम यांना अटक केलीय. विशेष म्हणजे त्याआधी मुंबईत सदानंद कदम यांची ईडीकडून तब्बल चार तास कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सदानंद कदम हे अनिल परबांचे निकटवर्तीय आहेत.
सदानंद कदम यांना ईडीने अटक केलेली आहे. अनिल परब बॅग भरुन तयार राहा. शंभर कोटींचा घोटाळा आहे. पैसे आले कुठून? सचिन वाझेकडून की आरटीओ ट्रान्सफरने? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणी आरोप करत आहेत. अनिल परब यांनी सदानंद कदम यांच्या नावाचा वापर करून डमी मालक उभा केला होता. त्यानंतर कदम यांच्या नावावर सर्व व्यवहार करून मालक म्हणून स्वत:ची ओळख लपवली होती, असा आरोप सोमय्यांचा आहे.
सदानंद कदम यांच्यासोबत दिवसभर काय-काय घडलं?
ईडीचे पथक आज सकाळी दापोलीतल्या कुठेशी गावात दाखल झालेलं. ईडीचे अधिकारी आज सकाळी सर्च ऑपरेशनसाठी कुठेशी गावात दाखल झालेलं. त्यानंतर या पथकाने सदानंद कदम यांची भेट घेतली. या पथकाने सदानंद कदम यांना चौकशीसाठी ईडी कार्यालात बोलावलं. त्यानंतर कदम ईडी कार्यालयात आले आणि त्यांची तब्बल चार तास चौकशी झाली आणि चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली.