राज्यातील सोयाबीनचे दर अजूनही टिकून; शेतकऱ्याची भूमिका ठरली प्रभावी
नववर्षाच्या सुरवातीपासून सोयाबीनचे दर हे ६ हजार ते ६ हजार ३०० च्या आसपास आहेत. आवक सरासरीएवढी असतानाही हे दर टिकून राहिलेले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची राहिली असली तरी दरम्यानच्या काळात सोयापेंडच्या मागणीतही वाढ झाली नसल्याने हे दर टिकून राहिल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. सोयापेंडची मागणी सोयाबीन विक्राीबाबत शेतकऱ्यांची भूमिका यावरच सध्या सोयाबीनचे दर अवलंबून आहेत. सोयाबीनला वायदे बाजारातून वगळल्यानंतर बाजारातील दर मागणी आणि होणाऱ्या पुरवठ्यावरच ठरत आहेत. दिवसाकाठी थोड्याबहुत प्रमाणात दरात बदल होत असले तरी एका विशिष्ट्य दराभोवतीच सोयाबीने आहे.
गत महिन्याच्या तुलनेत सोयाबीनचे दर हे वाढलेले आहेत. ५ हजार ८०० वर असलेले सोयाबीन जानेवारी महिन्याच्या सुरवातीपासून 6 हजार 300 वर स्थिरावलले आहे. ४०० ते ५०० रुपायांची वाढ होऊन देखील सोयापेंडला सर्वसामान्यच मागणी राहिल्याने बाजारपेठेत हे चित्र पाबवयास मिळत आहे. देशांतर्गतच सोयापेंडचे दर अधिक असल्याने येथील बाजारात आणि निर्यातीसाठीही सोयापेंडला मागणी ही सरासरीच राहिलेली आहे.
सोयाबीनचे दर टिकवून ठेवण्यात किंवा त्यामध्ये थोडीफार वाढ करण्यामध्ये शेतकऱ्यांची भूमिकाही महत्वाची राहिलेली आहे. कारण अपेक्षित दर मिळाल्याशिवाय सोयाबीनची विक्रीच नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. यामध्ये टप्प्याटप्प्याने केलेली विक्री ही फायद्याची ठरलेली आहे. आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात जरी सोयाबीनची आवक वाढली असली तरी दरावर लक्ष केंद्रीत करुनच विक्री केली जात आहे.
सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ही दोन राज्य महत्वाची आहेत. हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही शेतकऱ्यांच्या भूमिकेमुळे आवक ही टिकून आहे. महाराष्ट्रात १ लाख १० हजार तर मध्यप्रदेशमध्ये १ लाख २५ हजार पोत्यांची आवक होत आहे. मागणीनुसारच सोयाबीनची आवक होत असून हेच मुख्य कारण आहे जर टिकून राहण्याचे. हंगामाच्या सुरवातीपासून बाजारपेठेचा अभ्यास करुनच शेतकऱ्यांनी आवक सुरु ठेवल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले नाही.वर टाकण्यास हरकत नाही