BREAKING: लोकल प्रवासासाठी लस घेणे बंधनकारक; राज्य सरकारचे आदेश
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारच्या पुढे गेली आहे. मात्र मुंबईत सध्या समाधानकारक असं चित्र आहे. मुंबईत रुग्णसंख्या घटू लागली आहे. मात्र संसर्ग कमी होत असल्यामुळे मुंबईकरांनी कोरोना नियम पाळण्यात हयगय करु नये, असे सांगण्यात येत आहे. तर असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेकदा केले आहे. दरम्यान, रुग्णसंख्या कमी झालेली असली तर लसीचे दोन्ही डोस घेतल्याशिवाय लोकलने प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. दोन्ही डोस घेतले असतील तर मुंबईत लोकलने प्रवास करता येणार आहे, तसा आदेश राज्य सरकारने दिला आहे.