1200 एल.पी.एम क्षमतेच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन, रोज 1500 रुग्णांना होणार लाभ
नवी मुंबईतील सिडको एक्सिबिशन सेंटर येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन आज आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले. मंदा म्हात्रे यांचा आमदार निधी आणि नवी मुंबई महापालिका निधीतून या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. या साठी 1 कोटी रुपये निधी आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला. तब्बल 1200 एल.पी.एम एवढ्या क्षमतेचा हा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प असून या माध्यमातून दिवसाला 1500 रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य होणार आहे.
दुसऱ्या लाटेत लोकांना १० ते १५ लाख रुपये खर्च करून खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत होते. तरी देखील अनके लोक ऑक्सिजन अभावी मृत झाले. तर काहींना बेड सुद्धा मिळत नव्हते. त्यामुळे वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा मोठा फायदा नवी मुंबईकरांना होईल अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली.