कृषीमंत्री सत्तार आले, पाच मिनिटांत पाहणी आणि फोटोसेशन; शेतकऱ्यांसासोबत चहा पिऊन निघून गेले, जिल्ह्यात चर्चा काय?
अहो साहेब द्राक्षांऐवजी गांजाची शेती करू द्या… दौऱ्यावर आलेल्या अब्दुल सत्तारांकडे केली अजब मागणी, नेमकं काय घडलं
नाशिक : सलग दोन आठवडे राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून भरपाईची मागणी केली जात आहे. त्यामध्ये चार महिन्यांपूर्वी सोयाबीनचे नुकसान झाले ट्याची नुकसान भरपाई अजून मिळाली नसल्याने शेतकरी संतापलेले होते. त्यातच कृषीमंत्र्यांचा दुपारचा दौरा हा तब्बल तीन तास उशिरा झाला त्यामुळे ताटकळत बसलेले शेतकरी अधिकच आक्रमक झाले होते. त्यात नाशिकच्या निफाड येथील शेतकऱ्यांनी अब्दुल सत्तार याची चांगलीच कोंडी केल्याचे पाहायला मिळाले. त्यातच अब्दुल सत्तार अवघ्या काही मिनिटांत पाहणी करून चहा पिऊन गेल्याने उलट सुलट चर्चा होऊ लागली आहे.
मंगळवारी दुपारी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे नाशिक दौऱ्यावर येणार होते. त्यांचा दौरा जवळपास तीन तास उशिरा झाला. नाशिक जिल्ह्यातील काही गावांना अब्दुल सत्तार भेट देणार होते. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार होते. त्यामध्ये ठोस भरपाईचे आश्वासन मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.
मात्र, अब्दुल सत्तार यांच्या दौऱ्यात असं काही घडलं की त्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. अब्दुल सत्तार यांचा तब्बल तीन तासाहून अधिक वेळ दौरा उशिरा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अधिकच वाढला होता. त्यात निफाड तालुक्यातील एकाच गावाला भेट दिल्याने शेतकरी चांगलेच संतापले होते.
अब्दुल सत्तार यांनी पाच मिनिटांत द्राक्ष बागेत जाऊन पाहणी केली, फोटो सेशन केलं, मिडियाशी बोलले आणि चहा पिऊन निघून गेले असंच काहीसे चित्र शेतकाऱ्यांच्या मध्ये निर्माण झाले आहे. त्यात शेतकऱ्यांनी अब्दुल सत्तार यांना प्रश्न विचारून त्यांची चांगलीच कोंडी केली होती.