जागतिक पातळीवर सध्या काबुली हरभरा तेजीत
सध्या काबुली हरभरा खातोय चांगलाच भाव
जागतिक पातळीवर सध्या काबुली हरभऱ्याला चांगली मागणी असल्याने कबुली हरभरा तेजीत आहे. चांगले भाव असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा काबुली हरभरादेशातून दुप्पट निर्यात करण्यात आला, म्हणजेच यंदा देशातील निर्यात वाढली आहे. बदलत्या वातावरणाच्या कबुली हरभऱ्याला यंदा चांगलाच परिणाम झाला. जागतिक पातळीवर काबुली हरभऱ्याला सध्या चांगली मागणी आहे. त्यामुळे देशातून काबुली निर्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढली.देशातील काबुली हरभऱ्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. या कारणाने सध्या काबुली हरभऱ्याला जागतिक बाजारासह देशांतर्गत बाजारात ही चांगले दर मिळतोय. यंदाचा विचार करता देशात सुरूवातीस 4 लाख 50 हजार टन उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतू यंदा या उलट उत्पादन घटून 4 लाख टनांवर स्थिर होईल.
सध्या काबुली हरभरा खातोय चांगलाच भाव देशातील उत्पादनही कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काबुली हरभरा दर आवकेच्या हंगामातही टिकून राहू शकातात, असा अंदाज बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.
अशा परिस्थितीत कसा राहील बाजार भाव पुढील काळात काबुली हरभऱ्याचे बाजारात भाव तेजीत राहतील का? याची बाजारघटकांमध्ये चर्चा आहे.
काबुली हरभरा तेजीत सध्या मिळतोय इतका दर
यंदा मेक्सिकोत मागील हंगामातील साठा देखील शिल्लक नाही. याचा फायदा देशातील काबुली हरभऱ्याला होत आहे. यामुळे भारतातील काबुली हरभऱ्याची   निर्यातीला एक संधी निर्माण झाली. तर यंदा काबुली हरभऱ्याची निर्यात दुपटीने करण्यात आली आहे. आकाराने लहान असणाऱ्या म्हणजेच 8 एमएम च्या काबुली हरभऱ्यालाही मागणी आहे. सद्यस्थितीत काबुली हरभऱ्याला बाजारात 7 हजारापासून पासून ते 10 हजारापर्यंत बाजार भाव मिळतोय. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात अजून तेजी येऊ शकते असा अंदाज जाणकाराकडून व्यक्त करण्यात येतोय.