मुंबई APMC मसाला मार्केटमध्ये ड्रायफ्रुट्सच्या दरांत किलोमागे १०० ते २०० रुपयांची वाढ
रमजान निम्मित सुक्यामेव्याची मागणी वाढली 
सुक्यामेव्याची गोडी वाढली !
परदेशातून येणाऱ्या ड्रायफ्रुट्सची   आवक वाढली.
नवी मुंबई : रमजान महिना सुरु होताच मुंबई APMC मसाला मार्केट्मधे   ड्रायफ्रुट्सची मागणी वाढली आहे. 
सुकामेवा घेण्यासाठी APMC मसाला मार्केटमध्ये गर्दी वाढली असून सुकामेव्याच्या पदार्थांनी बाजारपेठ सजलेली दिसत आहे.कॅलिफोर्निया येथून येणाऱ्या बदामामध्ये ८० रुपयांनी वाढ झाली असून अंजीर ३०० रुपये, काजू तुकडा सह सर्व सुक्या मेव्यामध्ये किलोमागे १०० ते २०० रुपयांनी वाढ झाली आहे .. 
सुकामेव्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली असून   ड्रायफ्रुट्सची मागणी वाढल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.. येत्या महिनाभरात देखील दर चढेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.. 
सध्या APMC   मसाला मार्केटमध्ये खजूर, अंजिर, पिवळी खारीक, काळी खारीक, बदाम, काजू, पिस्ता, डिंक, काळे किसमिस, असा सुकामेवा मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे. नागरिकांची सुकामेव्याला येत्या आठवडाभरात मोठी मागणी असणार असल्याने व्यावसायिकांनी विविध प्रकारचा सुकामेवा बाजारात विक्रीसाठी तयार ठेवला आहे.
सुक्यामेव्याचे भाव
अक्रोड 1400 ते 1600
बदाम 680 ते 900
काजू 800   ते 1300
पिस्ता खरा 1200 ते 1600
जरधालू 500 ते 1000
ममरा बदाम 2000 ते 3400
पिस्ता ग्री 2000 ते 2600
पिस्ता तुकडा 1600 ते 1800
बदाम स्लाइस 700
पिस्ताचा तुकडा 1800
किसमिस 280 ते 400
अफगाण किसमिस   600 ते 1000
ड्रायफ्रुट्स गोड भेळ 1100
ड्रायफ्रुट्स तिखट भेळ 1100
ड्रायफ्रुट्स 600 मिक्स 
चिल्का काजू लहान 800
चिल्का काजू मोठा 1000
मखाना 700 ते 1000
खजूर 240 ते 1200
अंजीर 1000 ते 1600