तुरीची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी; शेतकरी संतप्त
नागपूर येथील कळमना मार्केटमध्ये तूरडाळ केंद्र सरकारने ठरवलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कळमना मार्केटमध्ये काही तूरडाळ ५ हजार १०० ते ५ हजार ७०० रुपये दराने खरेदी केली जात आहे. शिवाय यात तूरडाळीची वर्गवारी करून हमीभाव ठरवला पाहिजे. शिवाय तूरडाळीचे खरेदी ठरलेल्या ६ हजार ३०० रुपये हमीभावाने सरकारने केली पाहिजे अशी मागणी शेतकरी करत आहेत.
ओल्या तुरडाळीला कमी दर दिला जातो. मात्र त्याची वर्गवारी ठरवल्यावर नक्कीच योग्य तो भाव शेतकऱ्यांना मिळेल असे शेतकऱ्यांना वाटत आहे. अशा व्यवहारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने स्वतः पुढाकार घेऊन तूर खरेदी करावी अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. हमी भाव मिळत नसल्याने हि शेतकऱ्यांची लूट असल्याचे मत काही शेतकरी व्यक्त करत आहेत. तर जर हमी भाव ६ हजार ३०० दिला आहे. त्यापेक्षा अधिक दरानेच खरेदी व्हावी अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. शिवाय ७ हजाराचा दर देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. केंद्र सरकार एमएसपीवर करोडो रुपये खर्च करत आहेत. मात्र शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्याचे चित्र नागपूर येथील कळमना बाजारपेठेत पाहायला मिळाले आहे.