मुंबई APMC फळ मार्केटमध्ये २५ परदेशातील विविध दर्जेदार फळे ग्राहकांच्या भेटीला
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये २५ ते ३० परदेशातील विविध फळे येत आहेत. हि फळे ग्राहकांचे खास आकर्षण ठरली आहेत. त्यामुळे ग्राहकांनी फळ खरेदीला चांगलीच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. शिवाय हि फळे उघड्यावर राहून सुद्धा ७ ते ८ दिवस टिकून राहत असल्याने लोक खरेदीला प्राधान्य देत आहेत. तर त्यांच्या दर्जेदारपणामुळे हि फळे लोकांचे खास आकर्षण ठरली आहेत. त्यात दक्षिण आफ्रिकेचा आंबा लोंकाना भुरळ घालत आहे. शिवाय विविध परदेशांमधून हि फळे असल्याने परदेशी फळ खरेदीचा आनंद ग्राहक घेत आहेत. देशी फळांपेक्षा परदेशी फळांची मागणी वाढली आहे.
जवळपास २० ते २२ देशांमधील सफरचंद मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये येत आहेत. टर्की देशातील सफरचंद सध्या बाजारात आले असून १०० ते १५० रुपये प्रतिकिलो दराने त्याची विक्री होत आहे. इटलीतून रॉयल गाला नावाचे आलेले सफरचंद १६० रुपये प्रतिकिलो विकेल जात आहे. तर इराणचे सफरचंद ९० रुपये प्रतिकिलो, पोलंडचे सफरचंद १५० रुपये प्रतिकिलो आणि काश्मीर सफरचंद ९० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. तर चीनमधून येत असलेली द्राक्ष ५०० रुपयांत किलोने विकली जात आहेत.   दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या आंबा ६०० रुपये किलो विकला जात आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे पलम देखील ४०० रुपये किलो आहेत. शिवाय इजिप्त देशाची संत्री देखील ग्राहकांना आवडत असून ११० रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहेत.
इराण देशातून किवी देखील बाजारात येत असून केवळ ३ नग १५० रुपयांना विकले जात आहेत. परदेशातून ६ ते ७ प्रकारची फळे मुंबई फळ बाजारात येत आहेत. तर बाजारात चीन, दक्षिण अफ्रिका, चिली, इटली, ऑस्ट्रेलिया, अमेरिका व स्पेन देशातून द्राक्ष येतात. तर पलम इटली, स्पेन व चीन देशातून येत आहेत. देशी द्राक्ष १०० रुपये किलो तर परदेशातून आलेले द्राक्ष ३०० ते ५०० रुपये विक्री केला जात आहे.
सफरचंद, ब्लूबेरी, पलम, पेयर, ड्रॅगन फ्रुट तर देशी पेक्षा परदेशातील फळांची अधिक मागणी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. शिवाय परदेशी आणि देशी फळांमध्ये केवळ २० ते ३० रुपये प्रतिकिलो फरक पडतो. शिवाय खराब होण्याचे प्रमाण कमी असल्याने ग्राहक परदेशी फळांना पसंती देत आहेत. परदेशी सफरचंदांपेक्षा काश्मीर सफरचंद स्वस्त असले तरी टिकाऊ नसल्याने परदेशी सफरचंदना चांगली मागणी असल्याचे   इम्पोर्टेड फळ व्यापारी अनु सहानी सांगत आहेत.