महाशिवरात्री निमित्ताने कलिंगड व खरबूजची मागणी वाढली
महाशिवरात्री निमित्ताने कलिंगड व खरबूजची मागणी वाढली
- मुंबई Apmc फळ मार्केटमध्ये   फळांची जोरदार विक्री
- कलिंगड ८ ते १२ रुपये किलो
- खरबूज १५ ते २० रुपये किलो दराने विक्री
नवी मुंबई : मुंबई Apmc फळ मार्केटमध्ये कलिंगड व खरबूजची मागणी वाढली आहे   . येत्या २ दिवसांवर महाशिवरात्री उत्सव येऊन ठेपला आहे . यानिमित्त सर्वत्र खखरेदीची रेलचेल सुरु आहे   त्याचप्रमाणे   मुंबई apmc मध्ये देखील फळ मार्केट मध्ये फळांची जोरदार विक्री होताना दिसत आहे .. फळ मार्केटमध्ये कलिंगड व खरबूजची मागणी वाढली आहे.. बाजार आवारात   दररोज कलिंगडच्या   ३० ते ४० गाड्यांची आवक होत आहे आणि खरबूजच्या २०-ते २५ गाड्या येत आहेत ..घाऊक बाजारात कलिंगड ८ ते ९ रुपये तर खरबूज २० ते २५ या होलसेल दरात फळविक्री होत आहे..शिवरात्री उत्सवानिमित्त   व येणाऱ्या उन्हाळ्याच्या मौसमात या फळांची मागणी वाढल्याने व्यपाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे .. येणाऱ्या काळातही भरघोस फळांची विक्री होईल अशी प्रतिक्रिया कलिंगड वयापारी शंकर चौरासिया यांनी दिली आहे.