केंद्र सरकारच्या तुरीच्या बाजारावर लक्ष
नवी मुंबई : केंद्र सरकार तुरीच्या बाजारावर लक्ष ठेऊन आहे. सरकारने तुरीच्या स्टाॅकबाबत कठोर भुमिका घेतलीय. सरकार व्यापारी, स्टाॅकिस्ट, मिलर्स आणि आयातदारांना आपल्याकडील स्टाॅकची माहिती देण्याच्या सूचना देत आहे. चुकीची माहिती दिल्यास कारवाई करण्याचाही इशाराही सरकारनं दिलाय. मग या सर्व घडामोडींचा तूर बाजारावर काय परिणाम होतोय? तुरीला सध्या काय भाव मिळतोय? पुढील काळात तूर बाजार कसा राहील? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट घडामोडीतून मिळनार आहे
तसंच १० हजार टन आयात तूर खरेदीसाठी निविदा काढल्यात. पण सध्या खुल्या बाजारात तुरीला चांगला भाव मिळतोय. त्यामुळं सरकारला तूर खरेदी करणं सोपं राहणार नाही. पण सरकार सतत व्यापारी आणि स्टाॅकिस्ट यांच्यावरील दबाव वाढवतंय. त्यामुळे व्यापारी आणि स्टाॅकिस्ट पुढील काळात आपल्याकडील काही माल बाजारात आणू शकतात.
त्यामुळं बाजारावर किंचित दबाव येऊ शकतो. पण तुरीचे दर नरमलेल्या पातळीवर जास्त दिवस टिकणार नाहीत. दर पुन्हा उभारी घेतील. कारण देशात यंदा उत्पादन घटलंय, आयात मालही स्वस्त नाही, विदेशात तुरीची कमी उपलब्धता आहे आणि देशातील बाजारातील आवक कमी आहे.त्यामुळे तुरीचे दर तेजीत राहतील, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार व्यक्त करत आहेत. सध्या तुरीला सरासरी ९ हजार ते ९ हजार ५०० रुपये क्विंटल भाव मिळतोय.पुढील काळातही तुरीच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे. खरिपात किती तूर लागवड होते आणि पाऊसमान कसे राहते, हे घटकही तूर बाजारावर परिणाम करतील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.