भाजपच अंदाज खरा ठरला तर,उद्धव ठाकरें संकटात येणार का ?
भाजपच अंदाज खरा ठरला तर,उद्धव ठाकरें संकटात येणार का ?
- दिल्ली लीकर घोटाळ्याचं कनेक्शन महाराष्ट्रापर्यंत?
- केजरीवाल-ठाकरे भेटीत काय घडलं ?
- भाजपचा संशय काय ?
मुंबई: चहुबाजूंनी संकटांनी घेरलेल्या उद्धव ठाकरेंवर आणखी एक मोठं संकट घोंगावत आहे. किंबहुना या संकटाची ग्वाहीच भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट झाली. या भेटीत नेमकं काय घडलं, याचं कनेक्शन आगामी काळातील रणनीतीनुसार दिसून येईल. मात्र या भेटीत काय घडलं असेल, याचा भाजपने काढलेला अंदाज खरा ठरला तर उद्धव ठाकरेंना धक्का देणारी ही बातमी आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याविरोधातील कथित दारू घोटाळ्याचं कनेक्शन तत्कालीन महाविकास आघाडी सरकारपर्यंत आहे का, असा संशय व्यक्त होतोय, सीबीआय कधीही या अँगलने चौकशी करू शकते, असं सूतोवाच आशिष शेलार यांनी केलंय..आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कदाचित सीबीआय लीकर घोटाळ्याच्या चौकशीसाठी महाराष्ट्रापर्यंत येऊन धडकेल, अशी भीती असल्यानेच केजरीवाल एवढ्या तातडीने उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले असावेत, अशी शंका आशिष शेलार यांनी व्यक्त केली.