मुंबई APMC फळ मार्केटमध्ये व्यापाऱ्याची फसवणूक करणारे चालक, सेल्समन आणि ग्राहक गजाआड
मुंबई APMC   फळ मार्केटमधील फळ व्यापाऱ्यांनो सावधान, जर तुमच्याकडे चालक आणि सेल्समन असतील तर तुमची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होऊ शकते. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून आयात निर्यात करणाऱ्या अनुसया कंपनीची जवळपास २५ ते ३० लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. ब्लूबेरी आणि एव्होकॅडो हि फळे परस्पर विकून हा अपहार केला आहे. या प्रकरणी तेजस शिंदे, जुनेद शेख व अनुज गोयल या तिघांना एपीएमसी पोलिसांनी गजाआड केले आहे.
मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये अनुसया फ्रेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ६० वर्षांपासून व्यवसाय करत आहे. या कंपनीची भारतात १३ ते परदेशात ७ कार्यालये आहेत. हि कंपनी विविध प्रकारची फळे आयात-निर्यात करते. या कंपनीत तेजस शिंदे चालक तर जुनेद शेख सेल्समन म्हणून १ वर्षांपासून काम करत होते. तीन-चार महिन्यांपासून तेजस या फळांचे बॉक्स जुनेदला देत होता. जुनेद त्याची परस्पर   विक्री करून ते दोघे पैसे वाटून घेत होते. मात्र तेजस हा चालक सुट्टीवर असताना कार चालक विजय राठोड याला त्या कामावर पाठवले. यावेळी जुनेद शेखने त्याला सुद्धा अशा प्रकारे फळे काढण्यास सांगितल्यावर त्यांनी हा प्रकार कंपनीचे व्यवस्थापक शशिकांत अडसूळ यांना सांगितला. यावर माहिती घेतली असता २३०० बॉक्स ऍव्होकॅडो ४००० रुपये प्रतिबॉक्स तर १५०० बॉक्स ब्लूबेरी २५०० रुपये प्रतिबॉक्स असा एकूण २५ लाखांचा माल यांनी परस्पर ग्राहक अनुज गोयल याला कमी दराने विकला होता.  सदर घटना व्यवस्थापक शशिकांत अडसूळ यांनी माहित पडल्यामुळे पुढील करोडो रुपयांचे नुकसान वाचले.तर अशा प्रकारे ग्राहक अनुज गोयल याने किती व्यापाऱ्यांना फसवले आहे. याचा तपास एपीएमसी पोलीस करत आहेत.