Maharashtra Breaking News: शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला प्रचंड यश, मागण्या मान्य; आज आंदोलन मागे घेणार
मुंबई : शेतकऱ्यांचा लाँग मार्च ठाणे जिल्ह्यापर्यंत आलेला आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावर सभागृहात निवेदन सादर करणार आहेत. त्यानंतर शेतकरी आपलं आंदोलन मागे घेणार आहेत. दुसरीकडे राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी अजूनही संपावर आहेत. या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या संपाचा सर्वाधिक फटका राज्यातील सरकारी रुग्णालयातील रुग्णांना बसला आहे. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घ्या.
शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला प्रचंड यश, मागण्या मान्य आज आंदोलन मागे घेणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत विधानसभेत निवेदन सादर करणार
त्यानंतर शेतकरी आपलं आंदोलन मागे घेण्याची घोषणा करणार
अनेक मागण्या मान्य झाल्या, चर्चा सकारात्मक झाल्याचं शेतकरी नेते जे. पी. गावित यांनी सांगितलं.
-गाड्या थांबवा, भाजपच्या कार्यालयात घुसा आणि कार्यालय तोडा मात्र काम करून दाखवा
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांचे जळगाव येथे युवा संवाद मेळाव्यात वादग्रस्त वक्तव्य
निवडणुका जर वादाने होत असतील तर तुम्ही जनतेचे काम वादानेच करा, राऊत यांचं आवाहन.
शहापूर येथे झाडावर वीज पडून झाड पूर्णपणे जळून खाक
शहापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात काल संध्याकाळ पासूनच वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला
किन्हवली परिसरातील उंब्रई गावाशेजारी एका झाडावर वीज पडल्याने झाड जळून खाक झाले आहे
सुदैवाने झाडा शेजारी कोणी नसल्यामुळे जीवीतहाणी झाली नाही
तसेच या गावातील राजेंद्र जयराम चौधरी, सुनील शंकर चौधरी आणि भगवान शंकर चौधरी यांच्या घरातील इलेक्ट्रिक उपकरणांचं विजेच्या झटक्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत कुठलीही बैठक झाली नाही: काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील
काँग्रेसची 48 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू मात्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा कशा मिळतील यातून पक्षश्रेष्ठ मार्ग काढणार
काँग्रेसला 8 जागा मिळणार असल्याची चर्चा, मात्र चर्चेतून आलेला आकडा हा काँग्रेसला कदापि मान्य नसेल.
-एसटी बस मध्ये महिलांना प्रवास तिकिटात 50 टक्के सवलत.
अमरावती : आजपासून एसटी महामंडळाच्या सर्वच एसटी बस मध्ये महिलांना प्रवास तिकिटात 50 टक्के सवलत,
निमआराम,वातावरणकुलीत,शिवशाही,शिवाई,शिवनेरी बस मध्येही 50 टक्के सवलत,
महिला सन्मान योजना नावाने चालणार ही योजना.
चंद्रपूर : नाफेडच्या चना खरेदी शेतकरी नोंदणीस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ
नाफेडतर्फे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात चना खरेदी
शेतकरी नोंदणीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली
खरेदी केंद्रावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करून घेण्याचे आवाहन
पुणेकरांच्या मिळकतकर सवलतीसंदर्भात मुंबईत आज बैठक
पुणे :   मिळकत करात 40 टक्के सवलत कायम ठेवण्याची माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची मागणी,
यासंदर्भात आज 2:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन,
बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार,
याच बैठकीत पीएमपीएल संदर्भात काही महत्वाचे निर्णय होणार.
-मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील प्रकल्पासाठी जागा हस्तांतरित
अहमदनगर : जिल्ह्यातील पहिला प्रकल्प राहता तालुक्यात साकारणार,
तालुक्यातील केलवड गावातील 5.45 हेक्टर शासकीय जमीन महावितरणकडे केली हस्तांतरित,
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकाराने साकारणार जिल्ह्यातील पहिला प्रकल्प,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सौर कृषी वाहीनी योजना मिशन मोडवर राबवण्याची केली होती सुचना,
लोणी येथील महसुल परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी महसुल विभागाला केली होती सुचना.
गोपीनाथ मुंडेंच्या सर्वात मोठ्या पुतळ्याचे उद्या लोकार्पण
नाशिक :  नितीन गडकरी, पंकजा मुंडे, मुख्यमंत्री आणि सर्व पक्षीय नेत्यांची राहणार उपस्थिती,
राज्यातील सर्वात उंच 16 फूट उंच पुतळ्याचे होणार लोकार्पण,
नाशिकच्या नांदूर शिंगोटे गावात होणार कार्यक्रम,
मुंडेंच्या सार्वजनिक कार्यक्रमाला गडकरींची पहिल्यांदाच उपस्थिती असल्याने राजकीय चर्चा,गडकरी काय बोलणार याकडे लक्ष.
-आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल घसरले
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा झाला परिणाम
आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय
केंद्र सरकार कधी करणार कर कपात
या महिन्यात पेट्रोल-डिझेलची विक्री घटली
देशात इंधनाची मागणी घटल्याने चिंता
कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने घसरण
मग नागरिकांना दर कपातीचा दिलासा केव्हा
-सोन्या-चांदीची राघोभरारी
सगळे अंदाज केले आडवे
सोन्याची जोरदार मुसंडी
चांदीने पण घेतली आघाडी
सोन्याची जोरदार घौडदौड
दरमजल करत रेकॉर्ड गाठणार
फेब्रुवारी महिन्यातील विक्रम मोडीत निघणार
चांदीची पण किंमतींवर कुरघोडी,
-केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, बैठकीकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष
बैठकीत देशातील कोरोना परिस्थितीवरही होणार चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी होणार केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यासाठी मोठी घोषणा होण्याचीही शक्यता