शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! 31 मार्चपूर्वी शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी
“राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट न पाहता त्यांना 31 मार्चपूर्वी कर्जमाफीचा लाभ द्यावा"
शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी
आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांना आता राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी देण्यात येणार आहे. कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत उपस्थित केला होता. याच त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. “महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील विविध बँकांच्या एक हजार 580 खातेदार शेतकऱ्यांना अद्यापही लाभ मिळालेला नाही. त्यांच्या कर्जखात्यावरील रक्कम व शासनाकडून आलेली कर्जमाफीची रक्कम यांचा ताळमेळ न जुळल्याने त्यांना कर्जमाफी मिळू शकली नाही. या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले असून, त्यांची एकूण कर्जमाफीची रक्कम 25 ते 30 कोटी रुपये आहे.” असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले आहे .. “राज्य सरकारने या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट न पाहता 31 मार्चपूर्वी त्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, जेणेकरून त्यांना पुढील हंगामासाठी कर्ज मिळू शकेल,” असे अशोक चव्हाण म्हणाले. यावेळी त्यांच्या या विधानावर उत्तर देताना सहकारमंत्री अतुल सावे यांनी सदर शेतकऱ्यांची 31 मार्चपर्यंत कर्जमाफी केली जाईल, असे सांगितले.