केवळ ४० टक्केच कापसाचा साठा शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिला

भारतीय शेतकऱ्यांना "जागतिला कापसाचा फटका"
"जागतिला कापूस फटका" भारतीय शेतकऱ्यांना बसला आहे .परिणामी यंदा दर दबावात राहतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे . शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसापैकी ६० टक्के बाजारात आला आहे. उर्वरित ४० टक्केच साठा असून बाजारात यापुढील काळात सुधारणांची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दर ८ रुपयांपेक्षा अधिक राहतील असे दिसून येत आहे ..
दरवाढीच्या अपेक्षेने साठवणूक केलेला कापूस अखेरीस आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी काढला. परिणामी बाजारात ६० टक्के कापूस आल्याचा दावा केला जात असून केवळ ४० टक्केच कापसाचा साठा शेतकऱ्यांकडे शिल्लक उरला आहे. अशा स्थितीत येत्या काळात बाजार दरात सुधारणा होण्याची शक्यता वर्तविली जात असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दर आठ हजा पल्ला गाठतील, अशी माहिती पणन महासंघाचे माजी व्यवस्थापक गोविंद वैराळे यांनी दिली. गेल्यावर्षीच्या हंगामात वर्धा जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये कापसाने उच्चांकी दराचा पल्ला गाठला होता. या भागात कापसाचे दर ११ हजार रुपयांपर्यंत गेले होते.
जागतिक   स्तरावर कापसाची झालेली पडझड त्यासोबतच भारत सरकारने कापसाची केलेली आयात याच्या परिणामी कापसाचे दर दबावात आले. सध्या ७६०० रुपये क्विंटल प्रमाणे कापसाचे व्यवहार होत आहेत. यातून कापसाच्या उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील होणार नसल्याने शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा होती. याच अपेक्षेतून शेतकऱ्यांनी कापसाची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केली. आता शेतकऱ्यांचा सयंम सुटत असून कुटुंबाची आर्थिक निकड त्यासोबतच नव्या हंगामाची तयारी याकरिता लागणाऱ्या पैशाची सोय म्हणून त्यांच्याद्वारे कापूस विक्रीसाठी काढता जात आहे.