गंदा है, पर धंधा है ये! मुंबई Apmc मसाला मार्केट मध्ये अनधिकृत बदाम कारखाने जोरात मार्केट संचालक स्वतःच्याच तोऱ्यात
Apmc मसाला मार्केटमधे गाळ्यावर अनधिकृतपणे बदाम फोडण्याचे कारखाने
मार्केट मधील जवळपास १० जागेवर बदामच्या अनधिकृतपणे प्रोसेसिंग यूनिट
- १० गाळ्यावर महिन्यात १०० कंटेनर बदाम फोडले जातात
- महिन्यात १० गाळ्यातून १०० कंटेनर ,१०० कोटींचा   उलाढाल
- बदाम फोडण्याची यूनिट मधून येणाऱ्या धुळीतून श्वास घेण्यासाठी त्रास
- मार्केट संचालक , FDA , आणि मुंबई APMC सचिव याकडे करतात दुर्लक्ष
नवी मुंबई: सुक्या मेव्याचा राजा म्हणून बदामाला ओळखले जाते. शरीर व मनाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी औषधी व अन्न अशा दोन्ही स्वरूपात बदाम वापरले जातात. बदामाला ड्रायफ्रूटचा राजा म्हटले जाते. लहानमुले, प्रौढ आणि वयस्करही आपल्या क्षमता आणि कॅपेसिटीनुसार बदामाचे सेवन करतात. तुम्ही जे बदाम खाता तो तितका उपयुक आणि फायदेशीर   आहे का, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मुंबई Apmc मसाला मार्केटमधे अनाधिकृतपणे बदामाची प्रोसेसिंग युनिट द्वारे   कशा प्रकारे पॅकिंग केली जाते ..
मुंबई Apmc मसाला मार्केटमध्ये   व्यापाऱ्याने आपल्या गाळ्यावर अनधिकृतपणे बदामाचा प्रोसेसिंग युनीट बसवून   बदामच्या व्यापार जोरात सुरु केला आहे.हे सगळे कारभार मार्केट संचालक यांच्या आशिर्वादाने सुरु असून 10 गळ्यातून महिन्यात जवळपास 100 कंटेनर मधून बदाम प्रोसेसिंग केला जात आहे.. महिन्यात   100 कोटीच्या व्यापार होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ,महत्वाची बाब अशी आहे की या बदाम कारखान्यातून निघणाऱ्या धुळीमुळे बाजारघटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ,यावर कारवाई करण्याऐवजी मार्केट संचालक आणि प्रशासन जाणून बुझुन दुर्लक्ष करत आहे .
अमेरीकेतून अख्या बदामाची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते आणि कंटेनर मधून मुंबई Apmc ड्रायफ्रुट्स मार्केटमधे आणले जातात ,व्यापाऱ्यांनी आपल्या गाळ्यावर बदाम फोडण्याची प्रोसेसिंग युनिट तयार केली असून मार्केट मधील जवळपास 10 जागेवर बदामाचा अनधिकृतपणे प्रोसेसिंग यूनिट आणी कोल्डस्टोरेज उभारण्यात आले आहे..अतिशय विकृत पद्धतीने येथील गाळ्यांवर बदामाची प्रोसससिंग केली जात आहे..मार्केटमध्ये पॅसेजच्या मध्यभागी ज्या प्रकारे कचरा वेचला जातो त्याचप्रमाणे येथे बदाम निवडून काढले जात आहेत .. बदाम कारखान्याच्या प्रोसेसिंग मधून जर बदाम फोडले जातात त्यामधून मोठ्या प्रमाणात जी   धूळ होते त्याचा त्रास येथील व्यापारी ,कामगार व खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकाना सोसावा लागत आहे .. यावरून असे समजते कि स्वास्थ्यसाठी लाभ देणारा बदाम आता आपल्या जीवनासाठी हानिकारक बनला आहे..
जवळपास 10 गाळ्यावर बदाम फोडण्याची कारखाने लावण्यात आले आहे प्रत्येक गळ्यामधे महिन्यात 10 कंटेनर प्रोसेसिंग करुन घाणीच्या जागेत माल पॅकिंग करुन विक्री केला जातो .. तब्बल 100 कोटींचा कारभार चालतो मात्र ज्या अनधिकृत पद्धतीने हा बदामाचा हानिकारक प्रकार सुरु आहे त्याला Apmc प्रशासनकडून   कुठल्याही प्रकारचे   नियंत्रण नसल्याने इथे मोठा अपघात होऊ शकतो .. या अगोदर सुद्धा आगीची घटना घडली असून महापालिका तर्फे नोटीस बजावण्यात आली आहे ..   महागड्या बदामाच्या कवडीमोल प्रोसेसिंग च्या अनधिकृत पद्धतीमुळे येथील व्यापारी त्रस्त आहेत. या धुळीचा इतक्या प्रमाणात त्रास होत असताना मार्केट संचालकाना आणि Apmc प्रशासनला निवेदन दिले मात्र   या प्रकारचा आढावा अजूनही घेतला गेला नाही.. शेवटी येथील कामगार आता काम सोडून जाण्याचा निर्णय घेत आहेत. या धुळीतून श्वास घेणे हि अवघड झाले आहे यातून असे समजते कि आरोग्यास लाभदायक   बदाम येथील नागरिकांना आपले स्वास्थ्य खराब करण्याची स्थिती निर्माण करणार आहे यावर पणन संचालक ,सचीव आणि अन्न औषध प्राशासन काय कारवाई करतील याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.