Big Breaking :अवघ्या देशाची उत्कंठा शिगेला, उरले फक्त काही दिवस, सत्तासंघर्षाचा निकाल कधी? वाचा सरन्यायाधीश काय म्हणाले?
Big Breaking :अवघ्या देशाची उत्कंठा शिगेला, उरले फक्त काही दिवस, सत्तासंघर्षाचा निकाल कधी? वाचा सरन्यायाधीश काय म्हणाले?
सामान्यांचं सरकार म्हणून ओळख सांगणारं एकनाथ शिंदे यांचं सरकार खरंच वैध आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी जनताही या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. हा निकाल आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आणखी फार काळ चालणार नाही. तारीख पे तारीख अशी स्थिती या केसची होणार नाही तर हा युक्तिवाद याच आठवड्यात संपवून निकालदेखील लवकरच मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हे वक्तव्य केलंय. त्यामुळे एकनाथ शिंदे तसेच ठाकरे गटातील आमदार-खासदारांची धाकधुक आणखी वाढली आहे. निवडणूक आयोगाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे एकमेश आशेचा किरण म्हणून ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे पाहिलं जातंय. त्यासोबतच सामान्यांचं सरकार म्हणून ओळख सांगणारं एकनाथ शिंदे यांचं सरकार खरंच वैध आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी जनताही या निकालाच्या प्रतीक्षेत आहे.