पुणेकरानों बाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचा, मेट्रोच्या कामांमुळे ही रस्ते केली बंद
पुणे मेट्रोची कामे सुरु, आता हे मार्ग असणार बंद
पुणे: पुणेकरांना मेट्रोतून लवकर प्रवास करता यावा यासाठी मेट्रो प्रशासनाकडून गतीने काम सुरू आहे. नुकतेच शिवाजीनगर ते रूबी हॉल मेट्रो क्लिनिक मेट्रो (Ruby Hall Clinic Metro Station) पर्यंत मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली. पुणे शहरात मेट्रो लवकर सुरु करण्यासाठी वेगाने कामे केली जात आहेत. या कामांमुळे वाहतुकीत काही बदल केले जात आहे. अनेक मार्गातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आता बाबासाहेब आंबडेकर पुतळा ते नगर रोडकडे जाणारी वाहतूक बंद केली जाणार आहे. ही वाहतूक पर्यायी मार्गाने जाणार आहे.
कधीपासून वाहतूक बंद
पुणे महामेट्रोकडून वनाझ ते रामवाडी मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहेत. या मार्गावर सर्व कामे झाली असली, तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतूजवळील वायडक्टचे काम अद्याप करण्यात आलेले नाही. यामुळे बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नगर रस्तावरील वाहतूक ३१ मार्चपासून २१ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. रात्री १० वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत ही वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे पुढील २२ दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू रात्री वाहतुकीसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी ही माहिती दिली.