सर्वसामान्यांसाठी खुशखबर, गव्हाचे दर 10 रुपये प्रती किलोने घटले
नवी मुंबई : देशात गव्हाच्या वाढत्या किमतीमुळे केंद्र सरकार हवालदिल झाले होते... पण आता अलिकडेच केंद्र सरकारकडून दर कमी करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानंतर एफसीआयने खुल्या बाजारात ४० लाख टन गहू विक्री करण्याची योजना तयार केली आहे. त्याच वरोवर सरकार
तर्फे निर्यात बंद करण्यात आली आहे.केंद्र सरकारच्या या उपायामुळे गव्हाच्या किमतींवर परिणाम होताना दिसून आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सह घरातील गृहिणींना देखील दिलासा मिळाला आहे.मुंबई APMC धान्य मार्केट घाऊक बाजारात सध्या महाराष्ट ,गुजरात व मध्य प्रदेशातून दिवसात जवळपास ४० ते ५० गाड्याची गहू आवक होत आहे ,घाऊक मार्केटचे गहू व्यापारी लालजी भाई यांनी सांगितले आहे की, गव्हाचा दर ३,५०० रुपये प्रती क्विंटलवरुन घटून २,५०० रुपये प्रती क्विंटलवर आला आहे. तर किरकोळ बाजारात नियंत्रण नसल्याने गहू ४००० रुपये प्रति क्विंटल विकला जात आहे .